मृणाल पुनरागमन करत आहे छोट्या पडद्यावर: ‘हे मन बावरे’

मृणाल पुनरागमन करत आहे छोट्या पडद्यावर: ‘हे मन बावरे’

माझिया प्रियाला प्रीत कळेना यातील आपली लाडकी मृणाल दुसनिस पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन  करत आहे. माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतील  अभिनेत्री मृणाल दुसनिस तिच्या अभिनयामुळे तिने सर्व रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेमुळे ती प्रेक्षांकाच्य घराघरात पोहचली. त्यानंतर तिने ‘ तू तिथ मी ‘ या मालिकेत चिन्मय मांडलेकर बरोबर अभिनय केला पुन्हा एकदा तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. त्यानंतर तिची अस्स सासर सुरेख् बाई ही मालिका सुरु होती त्या दरम्यान तिचा विवाह झाला व तिने मालिका क्षेत्रातून काही कालावधीसाठी विश्रांती घेतली होती. आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती आपल्या भेटीस येत आहे कलर्स मराठी वाहिनीवर सुरु होत असलेल्या ‘ हे मन बावरे ‘ या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिच्या छोट्या पडद्यावरच्या आगमनामुळे तिचे चाहते खूप खुश आहेत. ह्या मालिकेत तिच्या सोबत असणार आहे अभिनेता शशांक केतकर दोघेही मुख्य भूमिकेत असणार आहे.

 

READ ALSO : सई ताम्हणकर : लव्ह सोनिया मधली अंजली

शशांक केतकर आणि मृणाल दुसनिस हे दोघे या मालिकेच्या निम्मिताने पहिल्यांदाच एकत्र अभिनय करत आहे. या पूर्वी दोघांनी एकत्र काम केले नाही. त्यामुळे त्यांची एक नवीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शशांक केतकर त्याच्या या मालिकेतील भूमिकेसाठी खूप खुश आहे. या मालिकेत मृणाल आणि शशांक सोबत बिग बॉस मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली शर्मिष्ठा राउत सुद्धा असणार आहे. नुकताच ‘हे मन बावरे ‘ या मालिकेचा प्रोमो कलर्स मराठीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर टाकला आहे. एक नवीन कोरी कथा घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे त्यांची लाडकी अभिनेत्री व अभिनेता मृणाल व शशांक. या मालिकेची निर्मिती ही मंदार देवस्थळी यांनी केली असून त्याचे लेखन मधुगंध कुलकर्णी हिने केले आहे. या आधी हि शशांकने मंदार देवस्थळी यांच्या सोबत काम केले आहे. “ होणार सून मी ह्या घरची’” खर तर ही मालिका शशांकची पहिली मालिका, या मालिकेपासून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यांनतर त्याने मराठी चित्रपटात हि अभिनय केला आहे.

एक नवीन मालिका ‘हे मन बावरे’ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ९ ऑक्टोबर पासून. अजून त्याच्या वेळेबाबत काही कळले नाही.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author