के सेरा सेरा नावाच्या चित्रपटाद्वारे मृन्मयी देशपांडे करत आहे  दिग्दर्शनात पदार्पण

‘हमने जिना सिख लिया’ या २००८ सालच्या हिंदी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेल्या मृण्मयी देशपांडेने पुढे अग्निहोत्र(२००९), कुंकू(२००९) यासारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान घट्ट केलं. कट्यार काळजात घुसली (२०१५), नटसम्राट (२०१६), शिकारी (२०१८), फर्जंद (२०१८) अशा चित्रपटांमधून एकाहून एक सरस भूमिका गाजवणारी मृण्मयी देशपांडे आता दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. ती दिग्दर्शित करणार असलेल्या चित्रपटाचं नाव आहे…‘के सेरा सेरा’. हा चित्रपट या वर्षा अखेरीस प्रदर्शित होणार आहे.

       एका मुलाखती दरम्यान मृण्मयीने सांगितलं की, “तिला पहिल्यापासूनच दिग्दर्शिका व्हायचं होतं, हा आज-काल घेतलेला निर्णय न्हवे. मृण्मयी चित्रपटाच्या कथेवर गेले चार वर्षे काम करत आहे… तिच्याकडे अजून तीन स्क्रिप्ट तयार आहेत. पण तिने ‘के सेरा सेरा’ हि स्क्रिप्ट निवडली स्वतःच्या दिग्दर्शन पदार्पणासाठी. ती फक्त योग्य वेळेच्या शोधात होती, जी वेळ तिला यावर्षी गवसली. या चित्रपटाचे कथानक एका अशा जोडप्याच्या नातेसंबंधांची गोष्ट सांगतं, ज्यांचा नुकताच मधुचंद्र आटोपलेला आहे. त्या रात्रीनंतर जे त्या जोडप्याच्या आयुष्यात घडतं, त्याची कथा मृण्मयी रुपेरी पडद्यावर मांडणार आहे.”

 

 

प्रत्येकाच्या डोक्यात कोणती ना कोणती कथा घोळतच असते, त्याला ती जगापुढे मांडण्याची संधी हवी असते. पण सगळेच ते करण्यात यशस्वी होतातच असे नाही. दिग्दर्शन हि अवघड जबाबदारी आहे. जिथे चुकीला माफी नसते. जर तुम्ही बनवलेला चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या चालला नाही, तर तुम्ही सिनेसृष्टीच्या बाहेर फेकले जाता.. तुम्हाला दुसरं काम देण्यासाठी मानसं टाळाटाळ करतात. त्यामुळे बहुतेक जण चित्रपट दिग्दर्शित करण्याचा निर्णय अतिशय काळजीपूर्वक घेतात. याआधी सुबोध भावे, प्रसाद ओक, मृणाल कुलकर्णी, क्रांती रेडकर, मनवा नाईक यांसारख्या अनेक अभिनेते-अभिनेत्रींनी दिग्दर्शनात यशस्वी पाऊल ठेवलेलं आहे. काही ते पाऊल ठेवण्यासाठी उत्सुक आहेत.. त्यातीलच एक आहे मृण्मयी देशपांडे. आता पाहायचं हे आहे कि आपल्या अभिनयाच्या जादूने प्रेक्षकाच्या हृदयात घर केलेली मृण्मयी, आपल्या दिग्दर्शनाच्या मोहिनीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करू शकेल कि नाही ?

मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडींसाठी आणि गमती जमतींसाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...