रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या ह्या अभिनेत्रींच्या नावाच्या परितोषकाने होतोय मुक्त बर्वेचा सन्मान..

ही “मुक्ता” आणि ती होती “स्मिता”. दोघींकडे सशक्त  अभिनयाचा वारसा. चित्र आणि नाट्य सृष्टीच्या रसिक प्रेक्षकांना वेड लावलं होतं स्मिताने आणि त्याच रसिक प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवते आहे मुक्ता.  उंबरठा, जैत रे जैत हे जबरदस्त गाजलेले मराठी चित्रपट. “जैत रे जैत ” ने चाळिसाव्या वर्षात पदार्पण केलं. स्मिता पाटील  अभिनेत्री म्हणूनच जन्माला आली, सगळ्या छटा तिच्या डोळ्यात होत्या . तसाच तिचा चेहेरा वेगवेगळ्या साच्यात फिट व्हायचा. म्हणून ती रसिक प्रेक्षकांना वेड लावायची. मराठी आणि हिंदीत तिने अभिनयाचं कसब दाखवलं. भुरळ पडली हो सगळ्या सिने सृष्टीला. तिच्यावर भाळलेल्या एका हिरोचीच तिला भुरळ पडली, आणि स्मिता पाटील चित्रपट सृष्टीला दुरावली. राज बब्बरशी तिने लग्न केलं आणि  रसिकांच्या प्रेमाला पारखी झाली. तिच्या संसारत ती गुरफटली. आणि एक दिवस डोक्यात रक्तस्त्राव झाल्यामुळे तडकाफडकी सगळे पाश तोडून कायमची निघून गेली. 

तिचे चाहते हळहळले, कारण हिंदी आणि मराठी दोन्ही कडे तिने आपल्या अभनायची छाप उमटवली होती. त्यामुळे भारतभर तिचे चाहते होते. पण ती होती मराठी म्हणून मराठी चाहत्यांनी तिची स्मृती जपली जावी म्हणून गेल्या दोन वर्षांपासून म्हणजे २०१७ पासून तिच्या पुण्य तिथीला “स्मिता पाटील” च्या नावाने सिनेसृष्टीतल्या चांगली कामगिरी करणाऱ्या अभिनेत्रींना पुरस्कार सुरू केले आहेत. त्या निमित्ताने तिची आठवण सगळ्या सिने जगातला होईल आणि तिच्यासारखे अभिनय संपन्न होण्याची प्रेरणा ह्या कलाकारांना मिळत राहील. पहिल्याच वर्षी म्हणजे १९१७ सालचा  पुरस्कार जिच्या अदांवर आज सुद्धा रसिक प्रेक्षक फिदा आहेत अशा चिरतरूण अभिनेत्रीला हा स्मिता पाटील गौरव पुरस्कार दिला, ती अभिनेत्री म्हणजे “”रेखा””. जिचं नुसतं नाव ऐकल्यावर  डोळ्यासमोर उभ्या राहतात तिच्या सौंदर्याच्या सगळ्या मादक अदा, तिचा मोहक चेहेरा.एक लावण्याची खाण.

दुसरा एक पुरस्कार ह्याच बरोबर दिला जातो तो म्हणजे “स्मिता पाटील कौतुक पुरस्कार. ज्या अभिनेत्रीचं चित्रपट सृष्टीत, नाट्य सृष्टीत , आणि छोट्या पडद्यावर म्हणजेच टी व्ही वर चांगलं योगदान सिद्ध होतं तिला देतात हा पुरस्कार. २०१७ चा पुरस्कार पटकावला ” अमृता सुभाष ” ह्या गुणी अभिनेत्रीनं. आणि २०१८ चा गौरव पुरस्कार  स्मिता पाटीलच्याच  ‘जैत रे जैत’ ह्या चित्रपटाला जाहीर केला गेला, कारण ह्या चित्रपटाला ह्या वर्षी ४० वर्ष पूर्ण झाली. म्हणून एक स्मिता पाटील च्या चित्रपटातल्या गाजलेल्या गाण्यांचा कार्यक्रम आणि ह्या कार्यक्रमातच  स्मिता पाटील कौतुक पुरस्कार सुद्धा दिला जाणार आहे. आणि हा पुरस्कार पटकावलाय हिने म्हणजे आत्ताच्या सर्व कलागुणसंपन्न अभिनेत्रीनं म्हणजेच  “”मुक्ता  बर्वे”” हिने.

 
 

READ ALSO :  तुंबाड बघून दांडी गुल झाली? आता येतोय तुंबाड भाग दुसरा.. डरते रहो..!!

मुक्ता बर्वे  १९९९ पासून आपल्या ओळखीची आहे.  नाटक, टी व्ही आणि चित्रपट तिन्ही  बाजू भक्कम असलेली ही  ‘मुक्ता’ अगदी मुक्तपणे आपल्या अभिनयाच्याताकतीने यश मिळवते आहे. म्हणून ही सगळे पुरस्कार सहज खिशात टाकते आहे.  एक खूप मोठी यादी होईल हिच्या पुरस्कारांची. बहुतेक पुरस्कार हिने मिळवले  आहेत. म्हणजे स्मिता पाटील च्या ताकतीची अभनेत्री म्हणायला हरकत नाही.  हिने अभिनय केलेली नाटके, टी व्ही सिरियल्स, आणि चित्रपट ह्यांची यादी पण खूप मोठी आहे. पुण्याजवळच्या चिंचवड ची ही मुक्ता स्वतःच्या कला गुणांवर एवढी मुक्तपणे सगळ्या क्षेत्रात सहज वावरते आहे. हे तिच्या मुंबई पुणे मुंबई , जोगवा,  हृदयांतर, आम्ही दोघी, ह्या चित्रपटात आणि कोड मंत्र, छापा काटा , नाटक आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट. ह्या कलाकृतीतून जाणवले. 

म्हणून पुरस्कार आणि गौरव हे मुक्ता बर्वे ची मक्तेदारीच म्हणावी लागेल.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author