बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे बंपर घोषणा

दिवाळी नंतर २३ नोव्हेंबर रोजी ‘मुळशी पॅटर्न’ बॉक्स ऑफिसवर करणार धमाका

‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ या भाईटम गाण्याने प्रेक्षकांना अगदी वेड लावले. व ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात नेमके काय असेल याची उत्कंठा वाढवली. अभिनेता प्रवीण तरडे हा सर्वांच्या परिचयाचा. नाटकातून मालिका, चित्रपटात अभिनयाचा प्रवास करत आता थेट दिग्दर्शनाची धुरा हाती घेतली आहे. ‘देऊळबंद’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. आता ‘मुळशी पॅटर्न’ हा दुसरा चित्रपट घेऊन येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

 

READ ALSO : मराठी गाण्यांची सदाबहार मैफल भाग ५

‘मुळशी पॅटर्न’ ची सध्या तरुणाईमध्ये जोरदार चर्चा रंगलेली आहे, कारण ‘अराररा खतरनाक’ हे गाणे सुपरहिट झाले आहे. अत्यंत वेगाने व्हायरल झालेल्या, आयटम सॉंगच्याच धर्तीवर बनलेल्या या भाईटम सॉंगला नेटकऱ्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले, अल्पावधीत तब्बल पंधरा लाखाहून अधिक व्ह्युज या गाण्याला मिळाले आहेत. या गाण्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्कंठा प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली होती. त्या नंतर आता अतिशय हटके अंदाजातील मोशन पोस्टरमुळे तरुणाईची उत्कंठा अधिक ताणली गेली आहे.

अभिनेता, लेखक प्रविण विठ्ठल तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच सोशल मीडियावर मोशन पोस्टरद्वारे जाहीर करण्यात आली. अभिजित भोसले, जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची निर्मिती असलेला ‘मुळशी पॅटर्न’ दिवाळीनंतर बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास सज्ज झाला असून येत्या २३ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

‘मुळशी पॅटर्न’ मधून लेखक, दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांनी शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नावर भाष्य करताना महानगर आणि लगतच्या गावातील गुन्हेगारीचे भीषण वास्तव मांडले आहे. दिग्दर्शक म्हणून ‘देऊळबंद’ या पहिल्या चित्रपटातून आपले वेगळेपण दाखवलेल्या प्रविण तरडे यांच्या आगामी‘मुळशी पॅटर्न’ मध्ये नेमके काय आहे? हे लवकरच समजेल.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author