‘मुळशी पॅटर्न’च्या टीमचे अनोखे शस्त्रपूजन

मुळशी पॅटर्नच्या टीमचे अनोखे शस्त्रपूजन 

–    शेतकरी आणि चित्रपटातील कलाकारांनी केले शेतीच्या अवजारांचे पूजन

 

लेखक, अभिनेता प्रविण विठ्ठल तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या आगामी मराठी चित्रपटाच्या टीमने खंडेनवमी आणि दसऱ्यानिमित्त अनोखे शस्त्रपूजन केले. यावेळी शेतकऱ्यांकडून शेतीच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध अवजारांचे पूजन शेतकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत चित्रपटाच्या टीमने केले. अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची निर्मिती असलेला बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा आहे.

 

READ ALSO : मराठी गाण्यांची सदाबहार मैफल भाग ५

भारतीय संस्कृती मधील प्रत्येक सण, उत्सव हा शेती आणि शेतकऱ्याशी निगडित आहे. दसऱ्याची देखील एक कृषिविषयक लोकोत्सव म्हणून परंपरा आहे.  यामुळे दसऱ्याच्या निमित्त शेतीच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या नांगर, कूदळ, फावडा, विळा, खुरपी या अवजारांचे पूजन करण्यात आले, यावेळी नांदेड गावचे सरपंच गुरुदत्त कारले, शेतकरी अरविंद लगड, निर्माते अभिजित भोसले, प्रस्तुतकर्ते किरण दगडे पाटील, दिग्दर्शक प्रविण तरडे, अभिनेत्री मालविका गायकवाड, अभिनेते रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड सुनील अभ्यंकर, अमोल धावडे, जयेश संघवी, कार्यकारी निर्माते विशाल चांदणे आदी उपस्थित होते.

अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘मुळशी पॅटर्न’ दिवाळी नंतर बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास सज्ज झाला आहे. हा चित्रपट येत्या २३ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author