‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते

‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते

रंगभूमी हा अभिनेत्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अभिनयाचे धडे गिरवायला मिळतात ते रंगभूमीवर. मग प्रायोगिक रंगभूमी असो वा व्यावसायिक रंगभूमी. अभिनेत्याची जडण घडण ही रंगभूमीवरच होत असते. बऱ्याचदा अभिनेता हा रंगभूमीवर परिपक्व होतो. अभिनेत्याला त्याच्या अभिनयाची योग्य ती पावती त्याने केलेल्या अभिनयाला मिळालेल्या परितोषिकावरून मिळते. पण अभिनयाव्यतिरिक्त बरेच विभाग आहेत. त्यांचाही गौरव केला जातो. एखाद्या कलाकाराला त्याच्या कलेचं कौतुक म्हणून पारितोषिक दिले तर तो अजून कसून मेहनत घेतो. मग तो दिग्दर्शक, लेखक, संगीतकार, नेपथ्यकार, वेशभूषाकार, अभिनेता, रंगभूषाकार असा कोणीही असो. अशातच रंगभूमीवर मानाचा मानला जाणारा एक पुरस्कार म्हणजेच ‘पुरुषोत्तम करंडक’. महाविद्यालयीन तरुणाई अभिनयाचे धडे गिरवू लागते ते पुरुषोत्तम करंडकसाठी. ‘पुरुषोत्तम करंडक’ मध्ये मानाची पारितोषिके मिळविलेले काही उत्कृष्ठ कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत ते ‘‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात.

 

READ ALSO : आणि डॉ. काशिनाथ घाणेकर: आता काशिनाथ पर्व सुरु ….

बहुचर्चित मुळशी पॅटर्नमध्ये अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखकासाठीचे अनंत नारायण आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचे नटश्रेष्ठ गणपतराव बोडस पारितोषिक मिळालेले आहे, अभिनेते उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, अनिरुद्ध दिंडोरकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचे नटश्रेष्ठ गणपतराव बोडस पारितोषिक मिळालेले आहे. अभिनेता ओम भूतकर, देवेंद्र गायकवाड, क्षितीश दाते, देवेंद्र सारळकर यांनी नटवर्य केशवराव दाते पारितोषिकपटकावलेले आहे. शैलेश देशमुख यांना निर्मल पारितोषिक, स्नेहल तरडे यांना माई भिडे आणि अक्षय टंकसाळे यांना काकाजी जोगळेकर पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे.

महाविद्यालयीन तरुणाईसाठी ही खास पर्वणी असणार आहे. बऱ्याच दिवसानंतर अशी कलेची रुचकर मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.

अभिनेता प्रवीण तरडे लिखित, दिग्दर्शित मुळशी पॅटर्न हा चित्रपट येत्या २३ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author