अर्रार्रा…ने केली कमाल: मुळशी पॅटर्नची धमाल

अर्रार्रा…ने केली कमाल:  मुळशी पॅटर्नची धमाल

शेती हा भारताचा प्रमुख व्यवसाय आहे. भारतातील जवळपास बरीच शहरे शेतीशी निगडित आहे. शेतकर्‍यांना त्यांची शेती खूप प्रिय आहे. पण तीच काळी माय आपण एखाद्याला विकतो आणि आपल्याच शेतजमिनीवर बांधलेल्या इमारतीत रखवालदार म्हणुन काम करतो. हे दुःख खूप निराळे आहे. ही कथा जरी सखारामची असली तरी फक्त सखारामच नाही तर त्याच्यासारखे अनेकजण जे क्षणिक भौतिक सुखासाठी आपले कायमचं उदरनिर्वाहाचे साधन गमवुन बसतात. या कथेत आपली जमीन विकलेले एक शेतकरी कुटुंब आहे. गावचा पाटील असलेल्या सखाराम (मोहन जोशी) या कर्त्या पुरुषाने जमीन विकून आलेले पैसे संपल्यानंतर त्याच बिल्डरकडे वॉचमनची नोकरी स्वीकारलेली आहे. त्याचा मुलगा राहुल (ओम भूतकर) हे सारे पाहतो आहे आणि वडिलांना सतत टोचतो आहे. हातातील सारे काही संपल्यानंतर हे कुटुंब पुणे शहरात येते. वडील मार्केट यार्डमध्ये हमालीचे काम करू लागतात.

READ ALSO : ‘मुळशी पॅटर्न’ – समृद्ध करणारा अनुभव – क्षितीश दाते

ह्या चित्रपटावरून थोड्या फार प्रमाणात बंद पडलेल्या मुंबईच्या गिरणी आणि त्यात काम करणाऱ्या कामगारांच्या घरादाराची होणारी वाताहात व त्यातून नाईलाजास्तव गुन्हेगारी जगतात होणार प्रवेश याची आठवण मुळशी पॅटर्न बघतांना नक्की होते. हताश, निराश बापाची भूमिका मोहन जोशी यांनी योग्यरीत्या साकारली आहे. जमीन विकल्याची खंत सतत त्यांच्या डोळ्यात दिसते त्यामूळे संवाद साधताना त्यांचे डोळे नेहमी झुकलेले असतात. त्यांची चूक ही संपूर्ण कुटुंबाची वाताहत होण्यास कारणीभूत आहे. हे सतत त्यांना बोचत असते. राहुल आपल्या वडिलांच्या निर्णयामुळे आपण आज या परिस्थितीत आहोत अशी भावना बाळगून त्यांच्याशी वागतो आणि नकळतपणे गुन्हेगारी जगताकडे ओढला जातो. गुन्हेगारी जगताकडून मिळालेल्या पैशाला त्यांचे आई वडील नाकारतात. चुकीच्या मार्गाने मिळवलेले सुख त्यांना नको असते.

अप्रतिम संवाद, पटकथा, कथा आणि अगदी सुसंगत लेखनअसं या चित्रपटाच्या बाबतीत म्हणता येईल. लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी चोख काम केले आहे. दिग्दर्शक म्हणुन योग्य पात्रांची निवड, त्यांच्याकडून अपेक्षित अभिनय करून घेणे खूप गरजेचे असते हेच प्रवीण तरडे यांनी साधले आहे. मोहन जोशी, ओम भूतकर, क्षितिश दाते, उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे यांनी त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. नवीन असूनही मालविकाने अप्रतिम अभिनय केला आहे. प्रेमाची लाडीगोडी अप्रतिम दाखवली आहे. संकलन आणि थोड्या रेंगाळणाऱ्या जागा अधिक काटेकोरपणे सांभाळल्या असत्या तर चित्रपट अधिक प्रभावशाली झाला असता. ‘मुळशी पॅटर्न’ खेड्याजवळ विकसित होणाऱ्या शहरांजवळ रहात असलेल्या प्रत्येक व्यक्तिची ही गोष्ट आहे. एकदा नक्की पहावा असा चित्रपट.

फिल्मीभोंगा मराठी कडून 5 पैकी 3.5 स्टार्स

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author