मुळशी पॅटर्न’च्या भाईट्म सॉंगला १० दिवसात १ मिलियन व्ह्युज

मुळशी पॅटर्नच्या भाईट्म सॉंगला १० दिवसात १ मिलियन व्ह्युज

 अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ चा सोशल मीडियावर धुमाकूळ

 जीएसटीनोटबंदीरेरावर भाष्य करणारे धमाल मनोरंजक गाणे

लेखक, अभिनेता प्रविण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या बहुचर्चित चित्रपटातील ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे  भाईटम सॉंग सध्या सोशल मिडीयावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. ठेका धरायला लावणारे हे खास सॉंग युवा वर्गात मोठ्या प्रमाणावर हिट झाले असून केवळ १० दिवसात या गाण्याला तब्बल १ मिलियन अर्थात १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ‘सैराट’ आणि ‘जाऊंद्याना बाळासाहेब’ या चित्रपटातील गाण्यानंतर झी म्युझिकच्या प्लॅटफॉर्मवरून अल्पावधीत लोकप्रिय होण्याचा मान ‘‘मुळशी पॅटर्न’ च्या ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ ला मिळाला आहे.

अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन्स आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवाच्या काळात आणि विसर्जन मिरवणुकीत ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘  या गाण्यावर तरूणाईने नृत्याचा आनंद लुटला. ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ ‘हे गाणे केवळ मनोरंजक नसून ंत्याला वास्तवाचे अनेक पदर जुळलेले आहेत. गत २ वर्षात भारतीय समाजकारण आणि अर्थकारणात झालेले परिवर्तन म्हणजेच नोटाबंदी, जीएसटी,  रेरा या महत्त्वाच्या मुद्द्यांचा या गाण्यात चपखल उल्लेख आहे.

आयटम सॉंगच्याच धर्तीवर बनलेल्या भाईटम सॉंगचे वैशिष्ट्ये म्हणजे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रविण तरडे पहिल्यांदाच डान्स करताना दिसतात. तसेच गाण्यात दिसलेले इतर कलाकार आणि व्यक्ती यापैकी कुणीही नर्तक नाही, तरीही नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव यांनी या सर्वांकडून मोठ्या कौशल्याने नृत्य करवून घेतले आहे. ‘देऊळबंद’ मध्ये अतिशय तरल गाणी लिहिणारे गीतकार प्रणीत कुलकर्णी यांनी हे अत्यंत हटके गीत लिहिले आहे, नरेंद्र भिडे हे संगीतकार आपल्या खास शैलीसाठी ओळखले जातात, त्यांनीही आपल्या चाकोरी बाहेर पडत हे गाणे संगीतबद्ध केले आहे, आदर्श शिंदेच्या आवाजातील हे भाईटम सॉंग याच नाविन्यपूर्णतेमुळे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्याचे दिसते. तसेच शहरातील एका भाईच्या वाढदिवसाची पार्श्वभूमी गाण्यात असल्याने पडद्यावर भव्यता येणे अपेक्षित होती, ती भव्यता डीओपी महेश लिमये यांनी आपल्या कॅमेऱ्यातून अत्यंत हटके टिपल्याचे व्हिडिओ मध्ये दिसते. गीत, संगीत, नृत्य यासह सर्वच तांत्रिक बाबींमध्ये हे गाणे अत्यंत उजवे ठरले आहे. विविध म्युझिक अॅप्स बरोबरच मराठी संगीत वाहिन्यांवरही ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘  गाणे ट्रेंडींग मध्ये आहे. अतिशय वेगळ्या कथेचा ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author