ही मुंबई आहे तरी कोणाची..? लवकरच उत्तर द्यायला येतोय राकेश बापट..

ही मुंबई आहे तरी कोणाची..? लवकरच उत्तर द्यायला येतोय राकेश बापट..

 

आमची मुंबई, मुंबई आमचीच, आपलीच आहे बाबा मुंबई, मुंबई ह्यांची, मुंबई त्यांची, मुंबई आमच्या हक्काची, सगळ्यांची जिव्हाळ्याची मुंबई, मग जो  मुंबईत कष्ट करतो, पोट भरतो, त्या सगळ्यांची मुंबई . मुंबईत आला आणि उपाशी राहिला असं उपाशी कधी कोणाला मुंबईने ठेवलं नाही बुवा. मुंबईत कोण कोण आलं पोट भरायला माहितीये ना? आधी फक्त शेतकरी शेती करायचे, आणि कोळी मासेमारी करत होते. मुंबईचं बंदर झालं तसे सगळे मुंबईकडे धावले, व्यापारी, गुजराथी, मारवाडी, अफगाणी, इराणी, सगळ्या प्रकारचे लोक आले, स्मगलर सुद्धा आले, त्यांनी आपल्या टोळ्या तयार केल्या, दहशत निर्माण केली. अशा अनेक टोळ्या तयार झाल्या, मुंबईच्या अनेक भागात ह्या टोळ्यांनी आपलं मोठं साम्राज्यच तयार केलं. दहशत, चोऱ्या, जुगार, लूटमार, ह्या सगळ्या गोष्टी मुंबईत सुरू झाल्या. वरदराजन, करीम लाला, रमा नाईक, चार्ल्स शोभराज, दाऊद इब्राहिम, अरुण गवळी, हे सगळे डॉन  तयार झाले, आणि मुंबई आपलीच आहे असं म्हणून, अवैध धंदे ,दहशतीचं साम्राज्य तयार झालं. आपसात टोळी युद्ध पण करत होते. मग आता ही मुंबई कोणाची?

 

READ ALSO :  महागुरू सचिनजी पिळगावकर घेऊन येत आहेत आजच्या तरुणाईसाठी खास व्हॅलेंटाईन डे स्पेशल चित्रपट..!!

मुंबईत पोट भरायला आले, आणि आपण कोणीतरी वेगळे आहोत म्हणून काहीतरी जबरदस्त करायचं, ह्या जिद्दीतून पैसे कमावण्याचा जो मार्ग मिळेल तो पकडायचा. पैसा हाती आला की त्याच्या जोरावर आणखी मोठं धाडस करायचं, चार गुंड हाताशी धरायचे. आणि दहशतीतून आपलं वर्चस्व सिद्ध करायची धडपड करायची. आपल्या भागात दबदबा निर्माण झाला की “डॉन” म्हणून वावरायचं. असे झाले होते सगळे मुंबईतले  ‘डॉन’. मग काय मुंबई आपलीच आहे. काहीही करा. ह्याला अंडरवर्ल्ड म्हणून ओळखलं जात होतं.  आता एक नवीन चित्रपट ह्याच ‘अंडरवर्ल्ड’ जगतातले आणखी काही बारकावे आणि थरार घेऊन लवकरच दाखल होतोय.सिने रसिकांना  वेगळं काहीतरी पाहायला मिळणार आहे. ह्याचं नाव पण “मुंबई आपलीच आहे” हेच असणार आहे. म्हणजे मुंबईतल्याच गुंडगिरीवर काहीतरी असणार हे निश्चित.  ह्या चित्रपटात आत्तापर्यंत कधीही न पाहिलेला थरार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. म्हणून खरी उत्सुकता आहे. कारण ‘मुंबईकरांनी’ ह्या अंडरवर्ल्ड चे काही मोठे थरार आपल्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत. 

‘मन्या सुर्वे’ हा सुद्धा एक टोळीचा नायक होता आणि त्याचा एन्काऊंटर बऱ्याच लोकांनी आपल्या डोळ्यांनी पहिला आहे. चेंबूरच्या पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीचा तो थरार रस्त्यावरच घडला होता.  पण आत्तापर्यंत लोकांनी  कधीच पहिला नसेल असा काहीतरी जबरदस्त थरार ह्या सिनेमात चित्रित केला आहे. तो अनुभवायला सगळ्यांनाच आवडेल.  ह्या थरार चित्रपटातला डॉन असणार आहे “राकेश बापट” ज्याने बरेच चित्रपट केलेत पण असली  भूमिका  तो पहिल्यांदाच करणार आहे. आणि ती त्याने चांगली वठवली आहे असा निर्मात्यांचा दावा आहे. तरुण अभिनेता आहे. सळसळत्या रक्ताचा , त्यामुळे पहायची उत्सुकता आहे. ह्या सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन ‘भरत सुनंदा’ यांनी केलं आहे. ‘राकेश’ बरोबर  ‘मीनल पाटील’ हा नवा चेहेरा झळकणार आहे.  बऱ्याच टी व्ही मालिका आणि हिंदी सिनेमातला एक चेहेरा म्हणजे ‘इकबाल खान’ ह्यात दिसणार आहे. आणखी  “अरुण नलावडे”  आणि किशोरी शहाणे-वीज हे दोघे सुद्धा वेगळ्या भूमिकेत चमकणार आहेत. अंडरवर्ल्ड डॉन वरचा सिनेमा म्हणजे मुंबईकरांच्या आवडीचा विषय आहे. बाकीच्या सिने रसिकांना वेगळा थरार अनुभवायचाय, नवीन वर्षात , काहीतरी नवीन अनुभव घ्यायला तयार राहा तर मग. ११ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय हा नवा चित्रपट. “” मुंबई आपलीच आहे””.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author