मुंबई पुणे मुंबई ३ मधील या खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

मुंबई पुणे मुंबई ३ मधील या खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

मुक्ता आणि स्वप्नील ही प्रेक्षकांची अतिशय आवडती जोडी आहे. ही जोडी प्रेक्षकांना भावली ती मुंबई पुणे मुंबई या मराठी चित्रपटाद्वारे. त्यानंतर त्यांची लोकप्रियता इतकी वाढली की या दोघांनी झी मराठी वाहिनीवरील ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकात काम केले ती मालिकादेखील खूप लोकप्रिय ठरली. ह्या जोडीला पुन्हा एकत्र केव्हा पाहायला मिळेल याची उत्सुकता रसिक प्रेक्षकांना अनेक दिवसांपासून होती. 

मुंबई पुणे मुंबई हा प्रवास आता त्याच्या तिसऱ्या टप्प्यावर आपल्याला घेऊन जायला येत आहे. ह्या चित्रपटात सर्वांची मने जिंकून घेणारी आणि आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर इतकी वर्षे अधिराज्य करणारी स्वप्नील जोशी आणि मुक्त बर्वेची गोड जोडी आता लवकरच आपल्याला तिसऱ्या सिक्वलमध्ये पाहायला मिळणार आहे. ह्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

 

READ ALSO : ‘मुळशी पॅटर्न’ – समृद्ध करणारा अनुभव – क्षितीश दाते

मुंबई पुणे मुंबई ह्या चित्रपटात गौरी आणि गौतमच प्रेम जुळलं नंतर दुसऱ्या भागात ते दोघे लग्नापर्यंत पोहोचले आणि आता तिसऱ्या भागात होणारी मज्जा तुम्ही ट्रेलरमध्ये पाहू शकता. आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे पालकत्व. भांडखोर आणि हट्टी असणारे ते दोघे, प्रेम ते आता आई वडील होण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे मुंबई पुणे मुंबई ३. हा ट्रेलर एकदा बघितल्यावर पुन्हा बघण्याचा मोह तुम्ही टाळू शकणार नाही कारण अनेकदा काही गोष्टींचा आस्वाद कितीही वेळा घेतला तरीही आपलं मन भरत नाही.

आई होण्यासारखे सुख या भुतलावर नाही. ह्या सुखापुढे जगातील सर्व सुख अगदी नगण्य आहेत. ही एक अनमोल देणगी आहे. जेव्हा कोणतीही स्त्री गरोदर राहते तेव्हा तिच्याबरोबर तिचा सहचारी देखील मानसिकदृष्ट्या गरोदरच असतो. गौरी आणि गौतम यांच्या आयुष्यातील हा सुंदर टप्पा आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पालकत्व स्वीकारताना होणाऱ्या छोट्या छोट्या घडामोडी नक्कीच प्रेक्षकांना अनुभवयास मिळतील. प्रेक्षकांना ट्रेलर पाहिल्यावर एक खास बात लक्षात येईल कि गं साजणी हे गाणेदेखील प्रेक्षकांना नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. यातील साज जरा वेगळा आहे. मुक्ताने यात कमरेला ढोल बांधून तो वाजवला आहे. हे गाणे पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला नक्की आवडेल. गौरी व गौतमची पुढील धमाल नक्कीच खूप आनंददायक असणार आहे. ट्रेलर पाहून आनंद लुटा कारण हा चित्रपट प्रदर्शित होत आहे येत्या ७ डिसेंबरला.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author