कधी तू रिमझिम झरणारी बरसात…

कधी तू रिमझिम झरणारी बरसात…

कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्यात, हे गाणे सुरु होताच आठवण येते ती ‘मुंबई पुणे मुंबई’ या चित्रपटाची. या चित्रपटातील गाणेच नाही तर संवाद, व्यक्तिरेखा ह्यासुद्धा खूप सुंदर आहेत. चित्रपटाचे कथानक अतिशय वेगळ्या धाटणीचे आहे. एक तरुणी तिच्यासाठी तिच्या घरच्यांनी पाहिलेल्या उपवर मुलाला नकार देण्यासाठी पुण्यात दाखल होते. अपघाताने ती त्याच मुलाला भेटते व त्याच्याच घराचा पत्ता विचारते. तो मुलगा तिला भेटत नाही म्हणून ती त्याची वाट पाहण्याचे ठरवते. हा मुलगा जो तिला पत्ता सांगतो ती आणि तो सम्पूर्ण एक दिवस एकत्र घालवतात. दिवसाच्या शेवटी ते दोघे एकमेकांना आवडायला लागतात. अगदी सरळ, साधा, सोपा विषय अगदी सहजतेने मांडल्यामुळे सर्व प्रेक्षकांना तो खूपच भावला.

 

READ ALSO : मी शिवाजी पार्क: न्याय देवता आंधळी असते पण आम्ही नव्हतो!

‘मुंबई पुणे मुंबई ‘हा चित्रपट आजही त्याचा ताजेपणा तसाच ठेवून आहे. दोन वेगवेगळ्या शहरातील दोन वेगवेगळे तरुण आपापल्या शहारांबद्दल अभिमान बाळगतात व आपले शहर हे दुसऱ्या शहरापेक्षा कसे सरस आहे हे सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. त्यांच्यातील संवादातून खालील गोष्टी अधोरेखित होतात व आपण त्यातील वैशिष्ट्यांमध्ये गुंतत जातो. पुणे शहर आणि शहरात जागोजागी लावलेल्या पाट्या ह्या सर्वत्र प्रसिद्ध आहे. पुणेरी लोक आणि पुणेरी पाट्या यांचा काहीच भरवसा नाही. मुंबई माणसांची प्रचंड गर्दी असलेली मुंबई. मुंबई म्हणजे स्वप्नाचे शहर. लाखो लोक डोळ्यात स्वप्न घेऊन मुंबईत येतात. गर्दीचे शहर म्हणजे मुंबई.

या चित्रपटात दोन शहर आणि व्यक्ती जोडल्या गेल्या आहेत. पुढे या चित्रपटाचा दुसरा भाग आला. पहिल्या भागातील अपेक्षित प्रश्न गौरी आणि गौतम लग्न करतील का? याचे उत्तर हे की हो त्यांनी दुसऱ्या भागात लग्न केले. नकार द्यायला आलेली गौरी गौतमला होकार देते. मुंबई पुणे मुंबई २ यात दोघे लग्नबेडीत अडकतात. त्यांचा लग्न सोहळा यात दाखवला आहे. सुरेख गाणी आणि अतिशय उत्तम संवाद यातही आहेत. अलगद वाऱ्यावर उडती बट सांगते तुला, हलकेच लावती पापणी बघ सांगते तुला, गुंतले जीव हे आपले जसे ओढ़ चंद्राची सागरा, साथ दे तू मला, साथ दे तू मला, हे गाणे खूप प्रसिद्ध झाले. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकाने दोन शहरांना एकत्र आणले आहे.

आता या चित्रपटाचा तिसरा भाग येत आहे. मुंबई पुणे मुंबई ३ हा नक्की प्रेक्षकांसाठी काय घेऊन येत आहे. नेमके गौरी आणि गौतम आयुष्यच्या कोणत्या टप्प्यावर असतील. आयुष्यतील कोणते वळण ते घेत असतील. या सिरीजच्या प्रेमात असलेल्या प्रेक्षकांना आता या चित्रपटाबद्दलदेखील खूप उत्सुकता आहे.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author