सब वरील सीरिअल मधून छोट्या पडद्यावर दणक्यात परत येतोय हा कलाकार..

मर्यादित भाग असलेल्या सोनी – सब वरील सीरिअल मधून छोट्या पडद्यावर दणक्यात परत येतोय हा कलाकार..

 

‘मेरा नाम’  हे दोन शब्द उच्चारले की दुसरे दोनच शब्द आपल्या डोक्यात येतात, एक म्हणजे, ‘जोकर’, आणि दुसरा  म्हणजे ‘लखन’. “जोकर” एकच होऊन गेला  ‘राज कपूर’ , त्या नंतर  जोकर च्या फंदात कुणी पडलंच नाही. पण ‘लखन’ मात्र उदंड झालेहो . पण हे सगळे लखन वेगवेगळे होते, कोण होता ‘सजनोंका सजन’, तर कोण होता वन टू का फोर. कोण अंगात बंडी, गुडघ्यापर्यंत  धोतर, डोक्याला लाल पंचा गुंडाळलेला, खेड्यातला येडा लखन, असे सगळे लखन आपण  बऱ्याच सिनेमात बघितलेत.  हे खेड्यातले गरीब दिसणारे लखन बऱ्याच अभिनेत्यांनी मोठ्या पडद्यावर सकारलेत. अगदी जुन्या राजेंद्र कुमार, सुनील दत्त  पासून, शाहरूख , गोविंदा पर्यंत.

लखन म्हणजे वेड घेऊन पेडगावला  जाणारे असलेच लखन जास्त पाहायला मिळाले.  म्हणजे मुख्य हीरो असलेले लखन. नावाचा परिणाम असाही होऊ शकतो. पण कॉलेजमध्ये जाणारा सुद्धा लखन असू शकतो. डॅशिंग लखन सुद्धा असू शकतो . आणि तो पाहायला किती बरं वाटेल ना? भले तो लखन व्हिलन सारखा असेल. भोळा नसेल, असाही लखन चांगलाच वाटेल की. तो लखन मुंबईतला असेल, शिकलेला तरुण असेल तर काहीतरी वेगळं पाहिल्याचं समाधान प्रेक्षकांना मिळेल  नाहीका?

 

READ ALSO :  १७ रात्रीत शूट केलेला सत्यपरिस्थितीवर आधारलेला, एक थरार चित्रपट.

“श्रेयस तळपदे” सारखा एकदम डॅशिंग लखन आवडेल काय तुम्हाला? मराठी आणि हिंदी दोन्हीकडे  वेगवेगळ्या डॅशिंग भूमिका करून एक चांगलं नाव कमावलेला हा हीरो आता येणार आहे , नवीन प्रकारचा “लखन” घेऊन. पण मोठ्या नाही छोट्या पडद्यावर. म्हणजे मालिके मध्ये.  साधा सरळ, मुंबईतला तरुण मुलगा, जो स्वभावानं सरळ आहे, लोकांना आवडणारा माणूस आहे.विचार चांगले आहेत. त्याचे कपडे पण एकदम मस्त , अगदी सूट होतील असेच. जरा फॅशनेबल. जरा स्मार्ट वाटणारे. कारण त्याला फॅशनेबल कपड्यांची आवड आहे. दिसायला हँडसम आहे. मग कोणाला आवडणार नाही?  पण हा एकदम ‘गरम डोक्याचा’ पण आहे बरका. जितका चांगला तितकाच खतरनाक.

जरा आठवा गोलमाल सिनेमा. २ ,३, ४ आणि ५ व्या गोलमालमध्ये पण ह्या श्रेयस तळपदे ची अफलातून कामं. एक भन्नाट हीरो आहे हा. नसिरुद्दीन शाह बरोबर सुद्धा त्यानं भारी काम करून पुरस्कार पण मिळवलाय.भरपूर मराठी आणि हिंदी सिनेमात हा झळकलाय. त्यांनी स्वतःचे पण ३/४चित्रपट आहेत, त्यातला गाजलेला चित्रपट म्हणजे “पोश्टर बॉईज”. ही सगळी त्याची मोठ्या पडद्यावरची करामत आपण पहिली आहे.  पण आता हा नवीन “लखन” घेऊन छोट्या पडद्यावर  येणार मग कसा असेल हा रोल? साधा सरळ तरुण आहेच पण  तो डॅशिंग रोल पण साकारणार आहे. “गुंडाचा रोल,”  पण त्याचा लुक तसा नसेल पण भाईगिरी करणार आहे छोट्या पडद्यावर. कुणाच्या विरुद्ध ह्याची भाईगिरी असणार आहे ते बघायला तयार राहा. कारण स्टोरी कळून घेतली पाहिजे ना. पण जास्त वाट नाही पहायची, लवकरच येणार आहे ही नवी मालिका ‘सोनी सब वाहिनीवर’. आणि मालिकेचं नाव असणार आहे ……….

 ” मेरा नाम है ‘लखन’ “।

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author