नाळ : नात्याची एक सुरेल गुंफण

जाऊ दे न वं, लहानपण दे गा देवा, असे आपण म्हणतो. लहान असतो तेव्हा आपण खूप निरागस असतो. चैतन्याच्या भावविश्वात घडणार्‍या कथेला निर्माता लेखक दिग्दर्शक यांनी योग्य न्याय दिला आहे. नागराज मंजुळे याने दिग्दर्शनातून चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आणि आज नाळ चित्रपट पाहिल्यावर एक प्रत्यय आला की नागराज मंजुळे हा एक ब्रँड झाला आहे. नाळ चित्रपटाची कथा ही जरी एका लहान नदीकाठी वसलेल्या गावात घडत असली तरी ती ग्रामीण व शहरी क्षेत्रात राहणार्‍या प्रत्येक व्यक्तीशी निगडित आहे. आई आणि मुलाच्या नात्याची सुंदर गुंफण या चित्रपटात केली आहे. सुंदर छायाचित्रणातून ग्रामीण भाग अतिशय नयनरम्य बनवला आहे अर्थात याचे सर्व श्रेय जाते ते दिग्दर्शक व छायाचित्रकार सुधाकर रेड्डी यंकट्टी यांना.  ही कथा आहे आठ वर्षीय चैतन्याची. ग्रामीण भागात राहणारा चैतन्य गावातील सधन जमीनदाराचा मुलगा आहे. त्यालाही इतर मुलांमध्ये खेळायला आवडते. पण अचानक एक दिवस त्याचा मामा येतो आणि त्याच्या आयुष्यातील एक रहस्य त्याला सांगतो. तिथे त्या निरागस मुलाचा सत्य शोधण्याचा प्रवास सुरू होतो. ओम भूतकरचा अभिनय संपूर्ण चित्रपटात उल्लेखनीय आहे त्याने शकुनी मामाचे काम अगदी योग्यरीत्या केले आहे. दीप्ती देवीचा चित्रपटाच्या शेवटी असलेला प्रवेश अगदी मार्मिकपणे रेखाटला आहे. ती आई आणि मुलामधील दुवा बनली. चित्रपटाचा नायक श्रीनिवास पोकळे भाव खाऊन गेला. अभिनयात निपुण असल्यासारखा त्याचा अभिनय सहज होता.

 

READ ALSO : आरॉन: गोष्ट एका प्रवासाची

देविका दफ्तरदार ही एक गुणी अभिनेत्री आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. अभिनयातील सहजता तिच्यात, तिच्या बोलक्या अभिनयातून एका आईचे ममत्व, व्यथा, काळजी योग्यरीत्या दिसून येते. नागराज मंजुळे हा लेखक दिग्दर्शक आणि निर्माता म्हणुन आपल्या परिचयाचा आहे पण त्याच्यातील अभिनयाचा एक नवीन पैलू ह्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर आला आहे. उत्तम संवाद लेखनाबरोबर उत्तम अभिनय त्याने केला आहे. सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी दिग्दर्शनाच्या पदार्पणातच उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अद्वैत नेमळेकर यांचे पार्श्वसंगीत अप्रतिम आहे, त्यात थोडा दाक्षिणात्य संगीताचा बाज जाणवतो पण तो अगदी योग्य आहे.

नाळ हा चित्रपट टिपिकल व्यावसायिक चित्रपटाच्या पठडीत बसत नाही तो वास्तववादी चित्रपट आहे. सत्यजित रे यांचे चित्रपट जसे असायचे तसाच काहीसा अनुभव नाळ चित्रपट देऊन जातो. नागराज मंजुळेला या चित्रपटासाठी हॅट्स ऑफ. मनोरंजन करण्यासाठी चित्रपट निर्माते वास्तववादी चित्रपटात उगीच आयटम साँग टाकतात असे नागराजने केले नाही त्याबद्दल त्याचे खूप कौतुक आहे.

थोडक्यात काय तर नाळ ही अगदी रोजच्या जगण्यातील गोष्ट आहे, त्याचा बाज ग्रामीण आहे, त्यातलं भावविश्वही गावातलं आहे. मात्र त्यात सांगितलेला आशय अगदी कोणालाही लागू पडेल असा आहे. चैतन्याला कळलेलं रहस्य नेमके काय आहे? त्याचा त्या सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास कसा होतो? त्या प्रवासादरम्यान काय काय घटना घडतात? अशा बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळतील ती फक्त नाळ पाहिल्यावर.  म्हैस आणि रेडुचे रुपक आई आणि मुलाचे नाते उलगडताना दाखवले आहे. झी स्टूडियो आणि निलेश मयेकर यांचे कौतुक त्यांनी पुन्हा एकदा एक नवीन वास्तववादी, मार्मिक चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. मनोरंजनाचा अट्टाहास नसलेल्यांनी तरीही सकस कलाकृतीची आस असलेल्यांनी नाळ हा चित्रपट जरूर पहावा.

फिल्मीभोंगा मराठी कडून नाळ चित्रपटाला 5 पैकी 4 स्टार.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...