नाळ : मातृत्वाची अनोखी गुंफण

नाळ :  मातृत्वाची अनोखी  गुंफण

जेव्हा नाळेचा उल्लेख होतो, तेव्हा ती नकळतपणे मातृत्वाशी जोडली जाते. आईचे आईपण सिद्ध करणारी नाळ. एक बाळ हे त्याच्या आईशी नाळेने जोडले जाते. ही एक सहज, सोपी, वाटणारी पण भावनिक गुंतागुंत आहे. मातृत्वाची जाणीव करून देणारा नाळ हा शब्द कानावर  जरी पडला तरी अंगावर शहारा येतो. अंतर्मनात एक अनाहूत चाहूल लागते. खूप हृदयस्पर्शी असा हा शब्द आपल्या तनामनाला जोडणारा. नाळेबद्दल जितके बोलू तितके कमीच असणार आहे. हि एक भावना आहे. या भावनेत खूप काही दडलं आहे. ‘नाळ’ हे शीर्षक घेऊन ‘सैराट’ आणि ‘फँड्री’ अशा वेगळ्या पण हृदयस्पर्शी चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे नागराज मंजुळे प्रेक्षकांसाठी नवीन मराठी चित्रपट घेऊन येत आहेत.

नाळ या शीर्षकावरूनच या चित्रपटाबाबत औत्सुक्य निर्माण होते. एकंदरच नागराजच्या आतापर्यंत आलेल्या ‘सैराट’ आणि ‘फँड्री’ या चित्रपटाप्रमाणेच याही चित्रपटात काहीतरी अनोखे नक्कीच असणार आहे. या चित्रपटाद्वारे नागराज चित्रपटनिर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा नुकताच दीड मिनिटाचा टीजर प्रदर्शित झाला. टीजरमध्ये एक रुईची बी उडतांना दिसत आहे, ती उडत उडत नदीत पोहणाऱ्या एका लहान मुलाच्या हातात पडते. टीजर पाहताच आपल्याला आपल्या लहानपणची आठवण होते. कारण आयुष्यात एकदा तरी आपण रुईची बी हाताळली आहे किंवा तिला पकडण्यासाठी तिच्या पाठीमागे पळालो तरी आहोत. टीजर पाहताच एक गोष्ट नक्की कळते ही पण एक भन्नाट कलाकृती असणार आहे. या चित्रपटाची कथा काय आहे हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. चित्रपटामध्ये लहान मुलांचं भावविश्व अधोरेखित करण्याचा पुन्हा एक प्रयत्न असावा असं निदान टीजरवरून वाटत आहे.

 

READ ALSO : मराठी गाण्यांची सदाबहार मैफल भाग ५

नाळचे लेखन नागराज मंजुळे यांनी केले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सुधाकर रेड्डी दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. सुधाकर रेड्डी यांनी सैराटचे छायाचित्रण केले आहे. ‘माझ्याच मनातली गोष्ट सुधाकर सांगतोय,’ असं नागराज यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं.  झी स्टुडीओज आणि नागराज मंजुळे पुन्हा एकदा एकत्र येऊन हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. आजपर्यंत दिग्दर्शक म्हणून आपण नागराज यांना पाहिलं आहे, आता निर्माते म्हणून नागराज कसे आहेत हे आपल्याला ‘नाळ’ या चित्रपटाद्वारे पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या १६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘नाळ’ मातृत्वाची आस पाहण्यास विसरू नका.

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author