सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

बऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून आजवर इंट्रोव्हर्ट असणारा हा मुलगा “बघतोस काय रागानं…डाव टाकलाय वाघानं, एका फटक्यात केला विषय एंड” असं म्हणत ‘गर्लफ्रेंड’ मिळाल्याचा आनंद अतिशय हटके अंदाजात आपल्या घरापासून ऑफिसपर्यंत साजरा करताना दिसत असून सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ बघायला मिळत आहे.

ह्यूज प्रॉडक्शन्स आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स प्रस्तुत, उपेंद्र सिधये लिखित – दिग्दर्शित ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटात नचिकेतच्या भूमिकेत अभिनेता अमेय वाघ आहे. नच्याला गर्लफ्रेंड मिळाल्याचा जल्लोष साजरे करणारे ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ हे गाणे जसराज जोशी यांनी गायले असून याचे गीतकार क्षितीज पटवर्धन आहेत, तर संगीतकार हृषीकेश–सौरभ-जसराज यांनी अतिशय हटके अंदाजात हे संगीतबद्ध केले आहे.

 

नचिकेतला ‘गर्लफ्रेंड’ मिळाल्याचा आनंद त्याच्या कुटुंबीयांना झाला असून या गाण्यामध्ये यतीन कार्येकर, कविता लाड हे त्याचे आई – बाबा त्याच्या आनंदात सहभागी होत नाचताना दिसतात. तसेच नच्याला ‘गर्लफ्रेंड’ मिळाली ही ब्रेकिंग न्यूज ठरली असून त्याच्या या यशाचा आनंद त्याच्या ऑफिसमधील सहकारी सागर देशमुख, रसिका सुनील, सुयोग गोऱ्हे यांना सुद्धा झाल्याचे गाण्यात दिसत आहे. एकंदरीत ऑफिस, घर, क्लब अशा सार्वजनिक ठिकाणी जाऊन हा नच्या आपल्याला गर्लफ्रेंड मिळाल्याचा आनंद व्यक्त करतो. विशेष म्हणजे गर्लफ्रेंड मिळाल्याने आपल्यात काहीतरी सुपर पॉवर आल्याची भावना त्याच्या मनात आल्याचे दिसते.

राहुल ठोंबरे आणि संजीव होवलादार यांची अतिशय सुंदर कोरिओग्राफी असलेले, वेस्टर्न म्युझिकच्या जवळ जाणारे हे गाणे प्रेक्षकांना थिरकायला भाग पडणार हे निश्चित. अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘गर्लफ्रेंड’ हा चित्रपट येत्या २६ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

Review

0%

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा...
0%

About The Author