नागराज पुन्हा एकदा झी स्टुडिओच्या साथीनं घेऊन येत आहे नवीन चित्रपट

नागराज पुन्हा एकदा झी स्टुडिओच्या साथीनं घेऊन येत आहे नवीन चित्रपट

नागराज मंजुळे यांचा सैराट या चित्रपटाने यशाचे शिखर गाठले, आणि मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळे स्वरूप मिळाले.  मराठी चित्रपटही १०० कोटींची कमाई करू शकतो. १०० कोटींची कमाई करून देणारा दिग्दर्शक आता कोणता चित्रपट घेऊन येत आहे याबद्दल सर्व रसिक प्रेक्षकांना एक उत्सुकता आहे. ती उत्सुकता आता लवकरच दूर होणार आहे कारण नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओ पुन्हा एकदा एकत्र काम करणार असून ते लवकरच प्रेक्षकांसमोर नवीन मराठी चित्रपट घेऊन येत आहे.

नागराज हा त्याच्या चित्रपटाच्या वेगळ्या धाटणीमुळे नेहमी चर्चेत असतो. त्याने आजपर्यंत केलेले चित्रपट हे , समाजातील चालीरिती, तळागाळातील समाजांचे प्रश्न, त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी यांच्यावर असतात. त्याने फॅन्ड्री या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीत दिग्दर्शनात पदार्पण केले. त्याचा तो चित्रपट यशाच्या शिखरावर पोहचला व प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतले. फॅन्ड्री पाठोपाठ सैराट हा चित्रपट आला, सैराटने तर सर्वच विक्रम मोडीत काढत एक वेगळा विक्रम तयार केला. सैराटच्या यशामुळे सैराटचे इतर भाषांमध्ये देखील चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. नागराज पुन्हा एकदा चर्चेत आला तो त्याचा एका लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला म्हणून “पावसाचा निबंध “ ह्यानंतर नागराज पुढे काय करणार ?याबद्दल प्रेक्षकांना खूप उत्सुकता तर आहे. पण याही पेक्षा आता नागराज काय घेऊन येणार हे सर्वाना जाणून घ्यायचे आहे.

 

READ ALSO : नंदू माधव – देविका दफ्तरदार प्रथमच एकत्र

नागराज मंजुळेच्या आजवर सगळ्याच चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओजने केली आहे. आता झी स्टुडिओजच्याच साथीने तो प्रेक्षकांसाठी चित्रपट घेऊन येत आहे. झी स्टुडिओच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती देण्यात आली आले. ‘झी स्टुडिओज’च्या ट्विटर अकाऊंटवरुनही याविषयीची माहिती देत एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. अवघ्या काही सेकंदांच्या व्हिडिओच्या माध्यमातून या नव्या प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली आहे. या व्हिडिसोबतच लिहिण्यात आले आहे की, फँड्री, सैराट… नंतर झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे पुन्हा एकदा एकत्र… लवकरच…

पण नागराज आणि झी स्टुडिओजच्या या आगामी चित्रपटाचे नाव मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. नागराज मंजुळेचा आगामी चित्रपट कोणता असणार याबाबत गोपनीयता राखण्यात आली असल्याने त्याच्या फॅन्सना त्याच्या चित्रपटाबाबत चांगलीच उत्सुकता लागली आहे.

नागराजच्या या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियाद्वारे अनेकांनी त्याला या आगामी चित्रपटासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

नागराजला त्याचा आगामी चित्रपटासाठी फिल्मीभोंगा मराठी कडून खूप खूप शुभेच्छा !! तू असाच यशाचं शिखर गाठत जा

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author