” येतोय “नशीबवान” भाऊ कदम”

हा भाssssऊ कदम कोsssण ? असा प्रश्न विचारणारा माणूस महाराष्ट्रात तरी सापडणार नाही. 

रंगाने सावळा आणि रूपात कुठेही गोडवा नाही , सडपातळ तर अजिबात नाही, सुंदर डोळ्यांचा…. तर ते पण नाहीत. आहो चित्रपटाच्या हिरोला साजेल असा एक पण रुबाब भाऊ कदम कडे नाही. आणि तरी सुद्धा  हा  “भाऊ कदम” आख्या महाराष्ट्राला रोज वेडं करतोय आपल्या अदांनी. आता अदा, म्हणावं तर रूपवान नसलेल्याला कुठं अदा असतात का? आणि लोभस म्हणावं तर निदान चेहरा तरी लोभसवाणा असायला पाहिजे ना? पण “निरागस चेहेऱ्यानं” असं म्हणायला हरकत नसावी. ते आपल्या भाऊ ला भारीच जमतं. ह्याचं कारण काय????

तर हा माणूस एखादा संवाद फेकतो त्यावेळी सगळं थिएटर ..’गुडघ्यात माना घालून हसत राहतं’,  पण ह्याचा चेहेरा मात्र असतो ‘निरागस’, जणू आपण काही बोललोच नाही. आणि हीच भाऊची खासमखास कला. हास्याची कारंजी नाही तर  हास्याचे धबधबे कोसळतात. हसून हसून मुरकुंडी वळणे म्हणजे काय ह्या म्हणीचा अर्थ कळतो. फू बाई फू च्या अनेक स्किट मधून ‘भाऊ कदमने’ लोकांना बदाबदा हसवायला शिकवलं. त्यापूर्वी लोक विनोदाला फक्त स्माईल द्यायचे. त्या अनेक स्कीट्स मधून भाऊने छोट्या मुलापासून म्हाताऱ्या पर्यंत सगळे रोल वठवले. आणि स्वतःला सिद्ध केलं.

त्यानंतर हा भाऊ झी मराठीच्याच चला हवा येउद्या…. मध्ये गाजतोय, त्यात त्याने परदेश वाऱ्या सुद्धा केल्या. वेगवेळ्या भूमिका अभिनयानं साकारण्या पेक्षाही अवघड गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या रूपातून प्रेक्षकांना सतत हसत ठेवणे. त्याच्या प्रत्येक एपिसोडमधून त्याने प्रेक्षकांची मुरकुंडी वळवली नाही असा एकही एपिसोड सादर झाला नाही. म्हणून आज अख्खा महाराष्ट्र भाऊ कदम ला ओळखतो आहे. हाच ‘भाऊ कदम’ एका गंभीर विषयाच्या कथेचा हीरो म्हणून आता प्रेक्षकांसमोर येणार आहे, तो कुठल्या स्टेज वर नाही तर चित्रपटातून एक वास्तव सादर करणार आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे ” नशीबवान”

महानगरपालिकेचा झाडूवला साकारणार आहे आता भाऊ, महानगरपालिकेची कचरा गोळा करणारी गाडी आणि त्यावर कचरा झाडून गोळा करणाऱ्या कामगाराच्या वेशात असणार आहे भाऊ कदम. खाकी युनिफॉर्म, हातात लांब काठी लावलेला झाडू, कचरा गोळा करण्यासाठी हातात दोन प्लायवूडचे तुकडे घेऊन प्रत्यक्ष ते काम करणारा भाऊ पाहायला मिळणार आहे. दिवाळीत सुरू झालं ह्या चित्रपटाचं शूटिंग. गल्लीबोळात शिरून कचरा गोळा करताना आपल्याला भाऊ दिसणार आहे. नाकाला रुमाल बांधून लोकांनी केलेली घाण साफ करताना दिसणार भाऊ. सोप्प नाहीये हे. पण सफाई कामगारांच्या व्यथा ह्या चित्रपटातून आपल्याला कळाव्यात हाच हेतू... त्यांच्या रोजच्या जीवनातले संघर्ष, घरातल्या कौटुंबिक अडचणी, त्यांच्या जीवनात येणारे वाईट दिवस, चांगले दिवस आणि त्यांचे आनंदाचे क्षण, सण साजरे करण्याची त्यांची पद्धत, आश्चर्यकारक घटना ह्या कशा चित्रित केल्या आहेत हे आपल्याला जाणून घेता येणार आहे.

 
 

READ ALSO : गोंडस चेहरा असूनही खलनायकी रूपातच का आवडतोय जितेंद्र जोशी?

कमी पैसे असतानाचे आनंदी जीवन हे कामगार कसे जगतात. त्यांच्या अपेक्षा काय असतात आणि त्या कशा पुऱ्या होतात. त्यांच्या जीवनात त्यांची पिळवणूक कशी केली जाते ह्याचे वास्तव आपल्यासमोर येणार आहे. संपूर्ण आयुष्यात ह्या कामगारांना काय काय सोसावं लागतं. त्यातून एखाद्याचं नशीब फळफळलं तर त्याच्या आयुष्यात काय बदल होतात हेही त्या चित्रपटात दिसणार आहे. व्यसनी कामगारांचे संसार कोणत्या गोष्टीने सांभाळले जातात का उध्वस्त होतात हेही वास्तव समोर येणार आहे. ह्या चित्रपटात भाऊ मुख्य भूमिका साकारणार आहे. सह कलाकार म्हणून नेहा जोशी ट्रेलरमध्ये झळकली आहे पण बाकी कलाकार बघायला आपल्याला चित्रपटगृहातच जायचंय. कारण ह्या गुणी कलाकाराच्या असल्या वेगळ्या विषयावरच्या चित्रपटाला न्याय मिळायला हवाय ना? असे विषय हाताळायला सुद्धा भाऊ कदम कमी पडणार नाही ह्याची खात्री आहेच. पण चित्रपट चालायला प्रेक्षक हवे असतात. म्हणून आपण हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहायला हवा म्हणजे भाऊ कदम सारख्या अफलातून कलाकाराला ही भूमिका केल्याचं चीज झालं असं वाटेल. आणि हा कलाकार आणखी नवीन नवीन भन्नाट कलाकृती साकार करेल.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...