नसिरुद्दीन शाह साकारणार एम. एफ. हुसैन

भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (आय.एफ.एफ.आय.) हा १९५२ सालापासून साजरा केला जातो. यंदा म्हणजेच २०१७ मध्ये या महोत्सव गोवा येथे साजरा करण्यात आला.अनेक मान्यवर मंडळी या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उपस्थित होती.यांत चित्रपट सृष्टीतील महत्वाच्या व्यक्तींबरोबरच राजकीय क्षेत्रातील मंडळींचा सहभाग देखील होता. यावेळी वेगवेगळ्या गाजलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले व चित्रपटसृष्टीत विशेष कामगिरी केल्याबद्दल अनेकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. परंतु या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठीच्या निवडप्रक्रियेतून ‘एस. दुर्गा‘ या दाक्षिणात्य चित्रपटाला व मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘न्यूड‘ या चित्रपटांना वगळण्यात आले. न्यूड या चित्रपटात  हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी एक चित्रकाराची भूमिका साकारली आहे.

न्यूड या चित्रपटाच्या ट्रेलर ची सुरुवात ही नसिरुद्दीन शाह यांच्या दृश्याने होते. चित्रपटाच्या ट्रेलर मधून असा अंदाज बांधला जातो आहे की न्यूड चित्रपटातील नसिरुद्दीन शाह यांची भूमिका ही प्रसिद्ध चित्रकार एमएफ हुसैन यांच्याशी मिळतीजुळती आहे.

ट्रेलर मधील एक दृश्यात नसिरुद्दीन शाह हे गाडीतून उतरतात तेव्हा त्यांच्या पायात पादत्राणे नाही आहेत. हे एम. एफ. हुसैन व नसिरुद्दीन शाह यांच्या भुकिकेतील एक साम्य दिसून येते. एम. एफ. हुसैन हे पादत्राणे वापरायचे नाहीत.

एम. एफ. हुसैन हे प्रसिद्ध चित्रकार असून त्यांनी भारतीय देव देवतांची न्यूड चित्रे काढली आहेत. अशा प्रकारची चित्रे काढल्यामुळे एम.एफ. हुसैन हे वादाच्या भोवऱ्यात सापडले. त्यांना त्यामुळे देशात प्रवेश वर्ज्य करण्यात आला होता. न्यूड चित्रपटात नसिरुद्दीन शाह यांनी अशा चित्रकाराची भूमिका साकारली आहे जो न्यूड चित्रे काढतो. ते चित्र काढत असताना त्यांच्या समोर जी महिला चित्रकाराच्या चित्रासाठी मूर्ती म्हणून विवस्त्र बसलेली असते ती स्त्री नसिरुद्दीन शाह यांना त्यांच्या न्यूड माणसांची चित्रे काढण्यावरून विचारते की तुम्ही अशी चित्रे का काढता. ट्रेलर मधून नसिरुद्दीन शाह त्या स्त्री चे चित्र काढता काढता तिला तिने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना दिसतात.

ट्रेलर मधून नसिरुद्दीन शाह यांनी साकारलेली न्यूड माणसांची चित्रे काढणाऱ्या चित्रकाराची ही भूमिका चित्रकार एम. एफ. हुसैन यांच्याशी साम्यांमुळे मिळतीजुळती वाटत असली तरीही चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत प्रेक्षकांना या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी वाट पाहावी लागेल. रवी जाधव यांच्या या चित्रपटाबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे यात काही शंका नाही.