नयना मुकेंना दादासाहेब फाळके पुरस्कार

नयना मुकेंना दादासाहेब फाळके पुरस्कार

मराठी चित्रपट सृष्टी ही विस्तारत असून दररोज अनेक तरुण – तरुणी याच चित्रपट सृष्टीत त्यांचे नशीब आजमावून बघण्याकरिता येतात.देशाच्या, राज्याच्या कान कोपऱ्यातून अनेक कलाकार येथे दाखल होत असतात परंतु त्यातील काही जणच यशाचे शिखर सर करण्यात यशस्वी होतात. नवोदित कलाकार येथे चित्रपट सृष्टीत येतात ते या चित्रपट सृष्टीत रुळण्याचा प्रयत्न करतात पण चित्रपट सृष्टी मात्र त्यातील मोजक्यांनाच आपलेसे करते. आज आपल्याला मराठी चित्रपट सृष्टीत अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतील. अशाच यशस्वी झालेल्या कलाकारांमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री नयना मुके हे होय.

फायनल डिसिजन मधील नयना मुके

नयना मुके ही सध्या फायनल डिसिजन या नाटकात अभिनय करीत आहे. नयना बरोबरच मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलाकार या नाटकात आहेत. मुंबईतील मालाड येथे नुकताच दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल पार पडला, तेथे मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर मंडळी उपास्थित होती.यावेळी दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलच्या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री या पुरस्काराने नयना मुके हिला सन्मानित करण्यात आले. नयना  अभिनय करत असलेल्या फायलन डिसिजन या नाटकाचे दिग्दर्शन व लेखन हे अनिल काकडे यांनी केले आहे.फायनल डिसिजन ह्या नाटकाचे कथानक  देहदान या महत्वपूर्ण विषयावर भाष्य करते.या नाटकात नयना हिने  रेणुका हिची भुमिका साकारली असून , या भूमिकेसाठी तिचे सर्वत्र कौतुक होते आहे. नयनाला तिच्या वाढदिवसाच्या काही दिवस आधीच हा पुरस्कार मिळाल्याने ती सध्या खुशीत आहे त्यामुळे यावेळचे तिचे वाढदिवसाचे सेलिब्रेशन नक्कीच खास असेल.

मालिका, चित्रपटातील नयना मुके

नयना मुके हिने मराठी मालिकांमधून अभिनय करत सुरुवात केली. नयना हिने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय केला आहे. नयनाने अभिनय केलेल्या मालिकांमधील एक म्हणजे गणपती बाप्पा मोरया  ही होय. गणपती बाप्पा मोरया या मालिकेतील नयनाने साकारलेली लक्ष्मी ही सर्वांना लक्षात राहण्याजोगी होती आणि त्या भूमिकेसाठी नयनाचे चांगलेच कौतुक झाले.नयना आपल्याला देवयानी या मालिकेतही दिसते. गजेंद्र अहिरे यांचे दिग्दर्शन असलेल्या अनवट या चित्रपटात व संजय जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या येरे येरे पैसा या चित्रपटात नयना मुके हिने अभिनय केला आहे. आजवर ज्या चित्रपट व मालिकांमध्ये नयनाने अभिनय केला त्या सर्वांतील तिच्या भूमिका या चांगल्या आणि महत्वाच्या होत्या.अनेक मराठी मालिका व चित्रपटांमधून झळकल्यानंतर नयना हिंदी चित्रपट सृष्टीकडे वळत आहे.लवकरच एक हिंदी चित्रपटात आपल्याला नयना एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Crisenta Almeida

"Crisenta Almeida is a seasoned writer who goes by the description, WRITER BY DAY. READER BY NIGHT. She has been a writer with the content industry for a good number of years, which inspired her to start her content agency. Madly in love with storytelling, she knows how to weave a tale."