‘रोटी डे’ साठी मराठी चित्रपट कलाकारांचे विशेष गाणे

‘रोटी डे’ साठी मराठी चित्रपट कलाकारांचे विशेष गाणे

आपल्या परिसरातील गरजूंना मदत करण्याचा ‘रोटी डे’ हा उपक्रम मागील चार वर्षांपासून अभिनेता अमित कल्याणकर या तरुणाच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. यंदा ही येत्या १ मार्च रोजी रोटी डे साजरा केला जाणार आहे. या उपक्रमासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील तब्बल ३८ हून अधिक कलाकार, तंत्रज्ञ यांनी एकत्र येऊन या सामाजिक उपक्रमाचे एक विशेष गाणे तयार केलेले असून ते गाणे लवकरच सोशल मिडीया, बिग एफएम व टीव्ही वर येणार आहे.

नचिकेत जोग लिखित ओंकार केळकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला सुरेश वाडकर, वैशाली सामंत, पं. संजीव अभ्यंकर, सावनी रवींद्र, ज्ञानेश्वर मेश्राम, ऋषिकेश रानडे, डॉ. सलील कुलकर्णी, संदीप खरे, क्रीशा चिटणीस, ओंकार केळकर, आर्या आंबेकर यांचा सुरेल आवाज लाभला आहे. तर अभिनेते विक्रम गोखले, मोहन जोशी, दिलीप प्रभावळकर, मकरंद अनासपुरे, प्रवीण तरडे, प्राजक्ता माळी, संस्कृती बालगुडे, नुपूर दैठणकर, विजू माने, मेघराज राजेभोसले, सुरेश विश्वकर्मा, रमेश परदेशी, नयन जाधव, सुनील गोडबोले, देविका दफ्तरदार, सिद्धेशर झाडबुके, सौरभ गोखले, किरण यज्ञोपावित, मिलिंद शिंत्रे, Rj संग्राम, श्रीकांत यादव, विजय पटवर्धन, मालविका गायकवाड, विनोद सातव, विनोद खेडकर, योगेश जाधव आदी ३८ कलाकार या खास गाण्यात दिसणार आहेत. हे गाणे डॉ. रमेश खाडे यांच्या चार्ली स्टुडीओत शूट झाले असून मयूर जोशी यांनी कॅमेरा केला आहे. शिवरंजनी स्टुडीओ मध्ये या गाण्याचे ध्वनिमुद्रण झाले आहे. या सर्व कलाकारांनी व तंत्रज्ञ यांनी सामाजिक बांधिलकी जपत कुठलेही मानधन न घेता आपल्या सक्रिय सहभागाने विशेष सहकार्य केले आहे.

पुण्याच्या फर्ग्युसन रोडवरून चार वर्षापूर्वी ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी अमितला एक जेमतेम ७-८ वर्षांचा भुकेला मुलगा विटांच्या मध्ये चूल मांडताना दिसला, न राहवून अमितने त्याच्यापाशी जाऊन चौकशी केली, त्यात भुकेची समस्या अमितला कळली. त्यानंतर अमितने मित्रांना घेउन ‘रोटी डे’ हा अनोखा उपक्रम करायचे ठरवले. रोटी डे हा केवळ एक दिवस नसून एक व्यापक उपक्रम आहे, यातून समाजाला एका सकरात्मकतेने एकत्र आणण्याचे काम होऊ पाहत आहे. कुठलीही संस्था नसताना व आर्थिक पाठबळाची मागणी नसलेला हा उपक्रम फक्त सोशल मीडिया च्या मदतीने पहिल्या वर्षी पुणे, मुंबई पर्यंत मर्यादित होता नंतर रोटी डे व्यापक स्वरूप घेत मागील वर्षी पर्यंत महाराष्टारील १२ जिल्हात राबवला गेला, यंदा संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा अमित आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मानस आहे.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author