मराठी सिनेमाला ‘मिडास टच’ देणाऱ्या ह्या अवलीयाची गोष्ट ऐका..!!

ग्लॅमरस जगातला पडद्यामागचा माणूस, ज्याची दखल ‘फॉर्ब्ज इंडिया’ ने घेतली. मराठी सिनेमाला ‘मिडास टच’ देणाऱ्या ह्या अवलीयाची गोष्ट ऐका..!!

 

भारतातील दिग्गज चित्रपट संस्थेतले म्हणजे बॉलिवूडचे लक्ष वेधून घेईल अशी कोणती संस्था असेल तर ती म्हणजे मराठी चित्रपट सृष्टी.. मराठी चित्रपटांना आणि चित्रपट सृष्टीला सध्या खूप मान मिळत आहे. एका पाठोपाठ एक दर्जेदार चित्रपट बनवले जात आहेत. त्यांची जाहिरात अशा प्रकारे केली जात आहे की ट्रेलर, प्रोमोशन पाहिल्यावरच लक्षात येतंय त्या त्या सिनेमाचं भवितव्य..! म्हणजे काशीनाथ घाणेकरच उदाहरण घ्या ना.. जेव्हा त्याचा पोस्टर रिलीज झाला तेव्हाच लोकांची उत्सुकता शिगेला पोचली होती.. ट्रेलर पाहुन तर राहवेना अगदी.. कधी एकदा सिनेमा पाहायला मिळतोय अशी चाहत्यांची अवस्था होती. त्यातून त्या सिनेमाशी संलग्न असलेले सगळे जण वेगवेगळ्या कार्यक्रमातून सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत होते. म्हणजे काय तर सिनेमाची कथा, त्यातील कलाकार आणि त्याचं मार्केटिंग ह्या सगळ्या घड्या व्यवस्थित बसायला हव्यात म्हणजे कसं, सिनेमा च नाणं खणखणीत वाजतं…!!

पण सिनेमाची सुरुवात होण्याआधीच खरे तर त्याचे भवितव्य ठरवले जाते.. कसे..?? म्हणजे त्याचं असं असतं, सिनेमाचे प्रोडक्शन हाऊस आणि फिल्म मेकर ह्यांच्या वेव्ह लेंथ जुळल्या की सिनेमा एकदम ‘कडक’ बनतो.. आणि तो पब्लिक पर्यंत पोहचवायण्या मध्ये मार्केटिंग टीम चा वाटा सगळ्यात मोठा असतो.. अशाच एका मराठमोळ्या, पूर्वाश्रमीच्या झी इंटरटेन्मेंटचे मार्केटिंग हेड असलेल्या निखिल साने ह्यांची दखल ‘फॉर्ब्स इंडिया’ ने घेतली. निखिल साने म्हणजे सिनेमा ‘सुपरहिट’ करून देणारे अशी त्यांची ओळख बनलीये. गेल्या काही वर्षात त्यांनी ज्या ज्या प्रोजेक्टला हात लावला त्याचं सोनं झालं.. सैराट, नटसम्राट, कट्यार काळजात घुसली, लै भारी, टाइम पास, किल्ला, एलिझाबेथ एकादशी, दुनियादारी, फँड्री आणि नटरंग ह्या सगळया चित्रपटांना निखिल साने ह्यांचा मिडास टच लाभला आणि त्यांचं खरंच सोनं झालं.. झी एंटरटेनमेंट सोडून वायकॉम् 18 मध्ये जॉईन केल्यावर त्यांच्या अखत्यारीत जो सिनेमा रिलीज झाला त्याला तर चाहत्यांनी सर्वोच्च शिखरावर नेऊन बसवले.. तो सिनेमा म्हणजे, ‘… आणि काशीनाथ घाणेकर’.. अर्थात त्याच्या मागे मास्टरमाईंड होते निखिल साने..!!

 

READ ALSO :  वेबसिरीज क्षेत्रातही रोवला मराठी झेंडा.. पहा कोण कोण गाजवतायत आपले नाव हिंदी आणि मराठी वेबसिरीज मध्ये

फॉर्ब्ज इंडियाकडे मुलाखतीद्वारे व्यक्त होताना निखिल साने म्हणाले की मराठी मध्ये खूप टॅलेंट आहे. पण पूर्वी फिल्म बनवणाऱ्यांची धाव फक्त चित्रपट बनवण्यापर्यंतच होती. आता मात्र चित्र पालटलंय.. चित्रपट बनवल्यावर तो योगय तर्हेने सगळ्यांपर्यंत पोहचवायला मदत करणारा मीडिया, जाहिराती, मार्केटिंग ह्या सगळ्या मध्ये फिल्ममेकर्स लक्ष घालतात.  म्हणजे चित्रपटाला काय लागते ह्याचे वर्तुळ पूर्ण झाले आहे म्हणजेच चांगली कथा, मार्केटिंग आणि कंम्युनिकेशन.. ते अजून पुढे म्हणतात की हिंदी चित्रपटांसारखे मोठे स्टार असतील तर सिनेमा चालतो हा फंडाच मराठीतून हद्दपार झाला आहे. कलाकार कोणीही असोत पण कथेच्या जोरावर सिनेमा सगळ्या लोकांपर्यंत पोहचवायचं काम आम्ही मार्केटिंग वाले करतो. (उदाहरणार्थ सैराट) खरे तर आता चांगला कन्टेन्ट घेऊन सिनेमा बनवायचा हा मराठीतला पॅटर्न बॉलिवूड नि पण स्वीकारला आहे. म्हणूनच बधाई हो, अंधाधून, स्त्री असे मोठे कलाकार नसलेले सिनेमे पण सुपरहिट ठरत आहेत. आणि रिजनल सिनेमाचं म्हणाल तर आता भारतभर रिजनल सिनेमा कधी रिलीज होतो हयाची वाट बघायला लावणारे बाहुबली सारखे चित्रपट बनू लागले आहेत. त्यांना स्वतःला मराठी सिनेमाला सुद्धा ह्याच उंचीवर नेऊन पोचवायचे आहे. वायकॉम् च्या मराठी ब्रँच चे बिझनेस हेड झाल्यावर निखिल साने अजूनही मोठे मोठे प्रोजेक्ट आपल्यासमोर आणतील. मराठी सिनेमा आणि सिनेसृष्टीचे नाव मोठे करण्यामध्ये पडद्यामागून हातभार लावणारे निखिल साने खरंच ह्या क्षेत्रात काही करू पाहणाऱ्यांसाठी आदर्श आहेत. फिल्मीभोंगा तर्फे त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप शुभेच्छा..!!

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author