मजेशीर धप्पा देऊन केले निपुण धर्माधिकारीनी ट्रोलर्सना त्यांच्याच ट्रोलिंगच्या खेळातून आऊट..

मजेशीर धप्पा देऊन केले निपुण धर्माधिकारीनी ट्रोलर्सना त्यांच्याच ट्रोलिंगच्या खेळातून आऊट..

धप्पा ह्या सिनेमाच्या ट्रेलर रिलीज नंतर निपुण धर्माधिकारीने यांची एक फेसबुक पोस्ट वायरल झाली आहे. त्यात ते म्हणतात, ‘’या चित्रपटाला राष्ट्रीय एकात्मतेसाठीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. चित्रपट न बघता, ट्रेलर बघूनच अशी प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. पण त्या एकात्मतेच्या राष्ट्रीय पुरस्कारापेक्षा तुम्ही म्हणता तेच आम्हाला योग्य वाटत आहे, त्यामुळे आमच्याकडून तुम्हाला ह्या चित्रपटाचं एक तिकिट भेट! अभिनंदन!नक्की बघा! धप्पा!’’

 

READ ALSO :  १७ रात्रीत शूट केलेला सत्यपरिस्थितीवर आधारलेला, एक थरार चित्रपट.

ही प्रतिक्रिया वाचून खूप जणांना आश्चर्य वाटले. पण खोचकपणे त्यांना ट्रोल करणाऱ्यांना मात्र चांगलाच धप्पा मिळाला. ट्रोलर्सनी निपुण ह्यांना धप्पाच्या ट्रेलरवरून ट्रोल केले होते. त्या ट्रेलर मध्ये लहान मुले गणेशोत्सवासाठी ‘झाडे पळाली’ हे नाटक बसविण्याचा निर्णय घेतात ज्यामध्ये पर्यावरण संरक्षण विषयीचा संदेश देणार असतात. या नाटकाच्या लेखिकेने वेगवेगळ्या पात्रांच्या मदतीने हा संदेश दिला आहे ज्यामध्ये येशू ख्रिस्त यांच्या पात्राचाही समावेश आहे. मात्र चित्रपटातील पात्रांना ही बाब खटकते आणि परिणामी या लहान मुलांच्या नाटकाला विरोध होतो. ज्या वयाच्या मुलांना ‘राजकारण म्हणजे काय?’ असा प्रश्न पडतो ती मुले या नाटकाचा प्रयोग करण्यासाठी ‘मिशन झॅप झॅप’ आखतात त्याचा मजेदार प्रवास चित्रपटात बघायला मिळणार आहे. आता ह्यातलं नेमकं ट्रॉलर्सना काय खटकलं हे त्यांनाच ठाऊक पण निपुण मात्र त्यांच्या ट्रोलची शिकार ठरले. पण त्यांनी उत्तरादाखल चांगलीच खोचक फेसबुक पोस्ट केली आणि ट्रोलर्सची बोलतीच जणू बंद केली.

गिरीश कुलकर्णी लिखित सामाजिक विषयावरील या चित्रपटाला ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात राष्ट्रीय एकात्मतेवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘नर्गिस दत्त’ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे. आता ह्या पारितोषिक विजेत्या सिनेमाला देखील ट्रोलिंग चा सामना काराव लागला असेल हे नक्कीच पाहिले पाहिजे. त्यासाठी १ फेब्रुवारीला प्रदर्शित होण्याऱ्या धप्पा ह्या चित्रपटाची ऍडव्हान्स बुकिंग करूनच टाका..!!

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author