काळाच्या हि पार मराठी चित्रपटांचा झेंडा फडकवण्यासाठी तयार आहे चित्रपट ‘वन्स मोअर’

काळाच्या हि पार मराठी चित्रपटांचा झेंडा फडकवण्यासाठी तयार आहे चित्रपट  ‘वन्स मोअर’

       आव्हानात्मक विषय हाताळण्यात मराठी सिनेसृष्ठी तरबेज आहे. अशाच एका आगळ्या वेगळ्या संकल्पनेवर आधारित, स्पेशल इफेक्ट्सनी भरलेला ‘Once मोअर’ हा चित्रपट ३१ ऑगस्ट रोजी प्रदर्शनासाठी सज्ज झालेला आहे. ‘Once मोअर’ या चित्रपटाचं कथानक प्रेक्षकांना काळाच्या सीमा ओलांडून दूर १४ व्या शतकात घेऊन जाणार आहे. जिथे काही रहस्यांची उकल होईल. अजून चित्रपटाचा टीझर किंवा ट्रेलर प्रदर्शित झालेला नाही पण निर्मात्यांकडून प्रदर्शित करण्यात आलेलं चित्रपटाचं टीझर पोस्टर व स्थिर पोस्टर खुपचं बोलकं आहे. ज्यात एक तरुण पुराणवस्तूसंशोधकाच्या वेषात दिसतोय. तर त्याच्या शेजारी उभी असलेली तरुणी हि जुन्या काळातील योध्याप्रमाणे सुसज्जित असल्याचं दिसतंय. एकंदरीतच त्या दोघांच्या पेहरावावरून असं लक्षात येतं कि, हे दोघेही वेगवेगळ्या काळातील व्यक्ती आहेत. त्याला दुजोरा हि मिळतो चित्रपटाच्या नावावरून… कारण ‘Once मोअर’ या चित्रपटाच्या नावात ‘Once’ इंग्रजीमध्ये अतिशय आधुनिक अशा फॉन्ट मध्ये लिहिण्यात आलेले आहे, तर ‘मोअर’ या शब्दाला जुन्या लिपीचा पोत दिल्याचं दिसून येतं. ‘मोअर’ शब्दामधल्या ‘मो’ ला दिलेला मात्रा टंकाप्रमाणे भासतो, तर ‘अ’ ह्या अक्षरात जुन्या जमान्यात वापरण्यात येणाऱ्या खंजीराचा आकार बनलेला दिसतो. त्याचप्रमाणे ती दोन्ही पात्र जिथे उभी आहेत ती वास्तू ऐतिहासिक आहे. थोडक्यात काय तर या चित्रपटात ‘टाईम travel’ म्हणजेच ‘विभिन्न काळातील प्रवास’ किंवा ‘समांतर जगातील कथा’ ह्यातील एक  संकल्पना वापरली गेली असल्यासारखं भासतं.

प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आशुतोष पत्की हा या चित्रपटाच्या नायकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. याआधी आशुतोषने ‘मेंदीच्या पानावर’ आणि ‘दुर्वा’ या मालिकांमध्ये अप्रतिम अभिनयकौशल्याचा नमुना दाखवलेला आहे. आता ‘Once मोअर’ या चित्रपटाद्वारे तो मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झालेला आहे. त्याच्यासोबत आपल्या नृत्याने अवघ्या महाराष्ट्राची मन जिंकणारी अभिनेत्री व नृत्यांगना धनश्री पाटील नायिकेच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल. तसेच रोहिणी हट्टंगडी, भारत गणेशपुरे, पौर्णिमा तळवलकर, स्वतः दिग्दर्शक नरेश बिडकर आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या ही या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत.

वंशिका क्रिएशन, देवस्व प्रोडक्शन तसेच लवंदे फिल्म व विष्णू मनोहर फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने तयार होत असलेला ‘Once मोअर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय नरेश बिडकर यांनी, तर ‘कालाय तस्मैय नमः’ या प्रसिद्ध मालिकेच्या लेखिका आणि नरेश बिडकर यांच्या पत्नी, श्वेता बिडकर यांनी या चित्रपटाची कथा-पटकथा–संवाद  लिहिलेले आहेत. या चित्रपटाच्या निर्मात्यांची नावे आहेत, धनश्री विनोद पाटील आणि सुहास जहागीरदार, तर निलेश लवंदे, विष्णू मनोहर,  अभय ठाकूर हे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी सांभाळलेली आहे संजय कुमार सिंग यांनी. तर संगीत दिलेलं आहे शैलेंद्र बर्वे यांनी. या चित्रपटाचे कला दिग्दर्शक आहेत देवदास भंडारे आणि संकलन केलंय निलेश नवनाथ गावंड यांनी. या चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शन केलंय चिन्नी प्रकाश, संदेश चव्हाण आणि श्वेता-तेजस यांनी, तर वेशभूषेचं काम सांभाळलेलं आहे चैताली डोंगरे यांनी.

मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडीं आणि गमती जमतीं जाणून घेण्यासाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.