Pari Hoon Main Review

परी हू में : एक भावनिक एका परीची परी होण्याची गोष्ट

प्रसिद्धी आणि पैसे ह्या अशा दोन गोष्टी आहे . त्या जर कमी वेळात किंवा कमी कष्टात मिळाल्या तर त्याचे महत्त्व कमी होत जाते. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा त्रासदायकच असतो. सध्याच्या काळात लहानमुलांना त्यांच्यात असलेल्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून आई वडील प्रयन्तशील असतात पण यश व पैसा या दोन्ही गोष्टी ते मिळवत असतानां त्यांचे लहानपण तर हरवत नाही ना . या  गोष्टीचा ते विचार करतात का ?

जिंकण्याच्या शर्यतीत कोण जिंकेल ?

परी हू में हा चित्रपट सर्वानी बघावा असा आहे. , यात साजिरी दिघे या लहान मुलीची गोष्ट आहे .  परी हू में हा चित्रपट इरावती कर्णिक लिखित वेगे वेगे धावू या नाटकावर आधारित आहे. साजिरी दिघे ही माधव दिघे व कल्पना दिघे यांची मुलगी ही अभ्यासाबरोबर इतर  बाबीतही प्रवीण आहे. ती सुंदर पण आहे . माधव,कल्पना आणि साजिरी यांचे एक सुखी कुटुंब असते , खूपकाही  सधन नसले तरी ते खाऊन पिऊन सुखी असे कुटुंब. अशातच एकदा साजिरी शाळेतील  एका नाटकात अभिनय करते तिथे काही मालिकांमध्ये काम करणारी मंडळी आलेली असतात त्यांचा साजिरींचा अभिनय आवडतो व ते तिला मालिकेत अभिनय करण्यासाठी विचारतात. प्रथम माधव याला नकार देतात पण नंतर एखादी ऑडिशन देण्यास काय हरकत आहे म्हणून ते साजिरीला ऑडिशन घेऊन येतात व योगायोगाने तिची निवड होते. मालिका सुरु होते काही दिवसातच साजिरी खूप लोकप्रिय होते . तिचे जग बदलते हा बदल फारच अचानक आल्या मुळे साजिरी पण खूप खुश असते . साजिरी बरोबर साजिरींच्या कुटुंबाची परिस्थिती बदलते. चाळीत राहणारे कुटुंब एका मोठ्या टॉवर मध्ये राहायला जातात. साजिरींच्या या यशाने तिच्या पेक्षा तिच्या वडिलांचे आयुष्य बदलते. पैसे आल्यामुळे ते सतत गाडीने प्रवास करतात. साजिरीला काय पाहिजे या पेक्षा तिच्या चाहत्यांना काय वाटेल त्याप्रमाणे ते तिला वागण्यास भाग पडतात. पण अचानक साजिरी अभिनय करत असलेली मालिका बंद होते. क्षणात आलेली प्रसिद्धी टिकवणे फारच कठीण जाते . व ही बदलेली परिस्थिती साजिरीला काही काळात नाही . याला कसे सामोरे जावे तिच्या आकलन शक्तीपेक्षाही पलीकडचे असते.

 

READ ALSO : बोगदातील आई :सुहास जोशी यांच्याबद्दल थोडे काही

या चित्रपटात दिगदर्शकाने  ही गोष्ट अगदी सहज पद्धतीने मांडली आहे. कुठल्याही प्रकारचा अतिपण यात नाही. श्रुती निगडेने साजिरींच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. तसेच नंदू माधव  आणि देविका दफ्तारदार यांनी अगदी सहजपणे आई वडिलांची भूमिका साकारली आहे. उत्तम चित्रपट ,उत्तम सवांद ,उत्तम अभिनय ,उत्तम संगीत  सर्वच बाबींनि उत्तम असा हा चित्रपट एकदा तरी प्रेक्षकांनी पाहण्यासारखा आहे.

या चित्रपटाला फिल्मीभोंगा मराठी कडून ५  पैकी ३ स्टार

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...