‘परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न

परी हूँ मैंया मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न

योगायतन फिल्म्स प्रस्तुत ‘परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अष्टपैलू व्यक्तीमत्व, राष्ट्रीय खेळाडू, कँब्रिज विद्यापीठातील टॉपर (२०१८), यंग भारतीय फाउंडेशनचे संस्थापक श्री. अमेय प्रताप सिंह यांच्या हस्ते ट्रेलर आणि म्युझिक लाँच करण्यात आले. योगायतन ग्रुपचे चेअरमन डॉ. राजेंद्र प्रताप सिंह आणि श्रीमती शीला सिंह चित्रपटाचे निर्माते असून दिग्दर्शक रोहित शिलवंत आहेत.

अभिनेते नंदू माधव, अभिनेत्री देविका दफ्तरदार, फ्लोरा सैनी, बालकलाकार श्रुती निगडे यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘परी हूँ मैं’ ग्लॅमरस चंदेरी दुनियेतील वास्तवाच्या जवळ जाणारा मनोरंजक, कौटुंबिक आणि भावना प्रधान चित्रपट आहे. या चित्रपटाला ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – २०१८’ मध्ये उत्कृष्ठ मराठी चित्रपट आणि उत्कृष्ठ मराठी अभिनेत्री पुरस्कार मिळाला आहे, तसेच अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘परी हूँ मैं’ चित्रपट नावाजला गेला आहे.

 

READ ALSO : नागराज पुन्हा एकदा झी स्टुडिओच्या साथीनं घेऊन येत आहे नवीन चित्रपट

‘परी हूँ मैं’ या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये साजरी दिघे ऑडिशन देताना दिसते, तिच्या बोलक्या आणि निरागस अभिनयातून तिला एका मालिकेत परी नामक ऐश्वर्यसंपन कुटुंबातील लाडक्या मुलीची भूमिका साकारायची संधी मिळते. साजरीचे वडील माधव दिघे हे तिच्याबाबत संवेदनशील आणि अतिशय महत्वाकांक्षी असून शूटिंगच्या वेळी ते तिच्यासमवेत सावलीप्रमाणे राहतात. तर दुसरीकडे अभिनयाच्या आणि झगमगाटाच्या दुनियेत आपल्या मुलीचे बालपण कुठे हरवू नये, याची तिच्या आईला काळजी आहे. प्रसिद्धी मिळाल्यानंतर साजीरी आणि तिच्या कुटुंबात होणाऱ्या बदलांचा वेध ‘परी हूँ मैं’ या चित्रपटात घेतल्याचे ट्रेलरमध्ये दिसते. चंदेरी दुनियेकडे मध्यमवर्गीय कुटुंबाच्या ध्येयपूर्तीची वाटचाल सांगणाऱ्या या चित्रपटाची कथा इरावती कर्णिक यांची तर पटकथा मच्छिंद्र बुगडे, रोहित शिलवंत आणि संकेत माने यांची असून संवाद योगेश मार्कंडे यांचे आहेत.

‘परी हूँ मैं’ या चित्रपटातील गाणी संगीतकार समीर सप्तीसकर यांनी संगीतबद्ध केली असून अभिषेक खणकर आणि सचिन पाठक गीतकार आहेत. चित्रपटात तीन गीते असून प्रत्येक गीत वेगळ्या जॉनरचे आहे, सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन, अमृता फडणवीस, जिया वाडकर आणि मंदार पिलवलकर यांचा स्वर गीतांना लाभला आहे. शंकर महादेवन यांनी ‘वेगे वेगे धावू’ हे गीत गायले असून अमृता फडणवीस यांनी ‘चंदण बिलोरी’ ही अंगाई तर मंदार पिलवलकर यांनी ‘चंदण बिलोरी’चे मेल व्हर्जन गायले आहे. ‘परी हूँ मैं’ चे शीर्षकगीत जिया वाडकर हिने गायले असून तिचे हे पहिले पार्श्वगायन आहे.

बहुचर्चित मध्यमवर्गीय दिघे कुटुंबातील साजिरी ‘परी’ येत्या ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author