पार्टी ‘मैत्रीचा हँँगओव्हर ‘

पार्टी ‘मैत्रीचा हँँगओव्हर ‘

मैत्री हि अशी गोष्ट आहे किंवा असे नाते आहे, ते लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांची मैत्री असतेच. आजवर मराठी चित्रपटसृष्टीत किंवा हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट मैत्री हा विषय मध्यवर्ती ठेवून तयार झाले आहे. त्याच पठडीत असणारा ‘पार्टी’ हा चित्रपट. चित्रपटाचा विषय जरी मैत्री असला तरी त्याचा आशय आणि आवाका हा वेगळा आहे. आजवर मैत्री व मैत्रीसाठी वेळ नाही देऊ शकलेले मित्र असेच आपण बघितले आहे. पण हि कथा आहे कोलेज मध्ये जाणाऱ्या चार मित्रांची

 

READ ALSO : बोगदा : आई मुलीच्या नात्याची गोष्ट

ओमकार (सुव्रत जोशी), सुमीत (स्तवन शिंदे), चकऱ्या (अक्षय टंकसाळे), मनोज (रोहित हळदीकर) हे एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स असतात. मजा-मस्ती करणे, दारू पिणे, मुली फिरवणे या गोष्टी त्यांच्यासाठी गोष्टी नित्यनियमाच्या झालेल्या असतात. सुमीतचे क्रिकेटर बनवण्याचे स्वप्न असते आणि त्यासाठी तो प्रयत्न देखील करत असतो तर दुसरीकडे ओमकार हा श्रीमंत असतो. त्याला कसलीच कमतरता नसते. चकऱ्या आणि मनोजच्या घराची आर्थिक परिस्थिती देखील बेताची असते. पण तरीही शिक्षण, पैसा कमवणे या गोष्टींचा दूरदूरपर्यंत देखील ते विचार करत नसतात. स्तवनच्या आयुष्यात अनेक मुली आलेल्या असतात. पण नातेसंबंधांकडे तो कधीच गांभीर्याने पाहात नाही तर याउलट ओमकार आणि चकऱ्या यांच्या दोघांच्या आयुष्यात त्यांच्या प्रेमाला प्रचंड महत्त्व असते. ओमकारचे प्रेम अपर्णा (प्राजक्ता माळी) तर चकऱ्याचे प्रेम दिपाली (मंजेरी पुपाला) वर असते. मजा मस्ती करणाऱ्या ह्या चार मित्रांचे आयुष्य कसे बदलते? ते त्यांच्या आयुष्यात असे काय घडते कि त्यांना त्यांच्या आयुष्यातील त्यांची मैत्री आणि आयुष्याचे गांभीर्य समजते. या सर्व बाबींचा योग्य पद्धतीने वापर या चित्रपटात केला आहे. मैत्रीवर असलेला हा चित्रपट नक्कीच सर्वांचे मनोरंजन करतो . चित्रपट पहातान आपल्याला आपल्या महाविद्यालीयीन दिवसांची आठवण येतेच.

सचिन दरेकर यांचा हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे त्यांनि  मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. चित्रपटाचे लेखनसुद्धा त्यांनीच केले आहे. चित्रपटाचे कथानक योग्यप्रकारे मांडले आहे. मनोरंजन आणि मैत्रीची व्याख्या अगदी सहजपणे मांडले आहे. प्रेक्षकांची उत्स्तुकता योग्यरीत्या ताणून धरली आहे. कथेत पुढे काय ? हे गमक जपले आहे. एकूणच कथा, संगीत, छायाचित्रण आणि अभिनय उत्कृष्ट झाला आहे. चित्रपटात स्तवन शिंदे, अक्षय टंकसाळे, रोहित हळदीकर, प्राजक्ता माळी, मंजेरी पुपाला आणि सुव्रत जोशी यांनी त्यांच्या व्यक्तिरेखा अगदी सहजपणे साकारल्या आहे.

एकंदरीत हा चित्रपट मनोरंजनाची धमाल आहे.

फिल्मिभोंगा मराठी कडून ३.५ स्टार ५ स्टार पैकी

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author