वाङ्मय चौर्य आता बॉलीवूड मध्येही

वाङ्मय-चौर्य : वर्षभरात प्रदर्शित होणाऱ्या अनेक चित्रपट वेगवेगळ्या विषयांना हात घालणारे असतात. काही विषय नवीन तर काही हे जुन्या चित्रपटांवर आधारलेले असतात. काहीवेळा दोन चित्रपटांमध्ये साम्यता आढळून येते. त्या चित्रपटांचे दिग्दर्शक वेगळे असले आणि जर कथा एकाच धाटणीची असल्यास त्यात साम्यता आढळण्याची शक्यता असते. जर अशा प्रकारचे साम्य आढळले तर त्यातील जो चित्रपट आधी प्रदर्शित झाला आहे त्या चित्रपटाच्या स्वायत्तता हक्काचा भंग होतो. जर ही वाङ्मयाची चोरी जाणून केली असल्यास आवश्यक ती कारवाई केली जाते. परंतु नेहमीच दोन चित्रपटांमधील साम्य हे वाङ्मय चौर्याचा परिणाम असेल असे काहीही नाही. हल्लीच प्रदर्शित झालेल्या शूजित सिरकार यांच्या ऑक्टोबर या चित्रपटाच्या बाबतीत असे झाले आहे.

सारिका मेणे

सारिका मेणे यांनी असा दावा केला आहे की शूजित सिरकार यांच्या ऑक्टोबर या चित्रपटाच्या कथानकातील काही भाग व पात्रे हे त्यांनी सारिका मेणे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आरती:द अन्नोन स्टोरी’  या चित्रपटातुन घेण्यात आले आहे.सारिका मेणे  दिग्दर्शित ‘आरती:द अन्नोन स्टोरी ‘ हा मराठी चित्रपट २०१७ साली प्रदर्शित झाला होता.‘आरती :द अन्नोन स्टोरी’ याची कथा ही सत्य घटनेवर आधारित होत.  या चित्रपटात आरती मकवाना ही भूमिका अंकिता भोईर या अभिनेत्रीने आणि सनी पवार ही भूमिका रोशन विचारे ह्या अभिनेत्याने केलेली आहे.हे दोघंही नवोदित कलाकार आहेत . या चित्रपटाच्या दिग्दर्शिका सारिका मेणे यांच्या मते वरुण धवन या सुप्रसिद्ध युवा अभिनेत्याची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आरती:द अन्नोन स्टोरी या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणेच आहे. सारिका मेणे यांचा चित्रपट हा त्यांच्या भावाच्या आयुष्यावर आधारित होता .विले पार्ले पोलीस ठाण्यात ऑक्टोबर या चित्रपटाच्यावआरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शूजित सिरकार यांची प्रतिक्रिया

‘आरती:द अन्नोन स्टोरी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शिका सारिका मेणे यांनी विले पार्ले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर ऑक्टोबर या चित्रपटाचे दिग्दर्शक शूजित सिरकार यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की ,त्यांनी या आधी ‘आरती:द अन्नोन स्टोरी’ या चित्रपटाविषयी ऐकले देखील नाही आहे.शूजित सिरकार यांना या चित्रपटाविषयी काहीही कल्पना नव्हती. तरीही ऑक्टोबर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी असे आश्वासन दिले आहे की या प्रकरणात पुरेसे लक्ष घालून आवश्यक त्या हालचाली करण्यात येतील. सारिका मेणे यांनी केलेल्या दाव्यामुळे व दाखल केलेल्या वाङ्म्य चौर्याच्या गुन्ह्यामुळे वरुण धवन याची प्रमुख भूमिका असलेला शूजित सिरकार यांनी दिग्दर्शित केलेला ऑक्टोबर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.