‘स्मार्ट फोनवर’ चित्रित होणारा, दिग्गज कलावंत असलेला पहिला मराठी चित्रपट.

‘स्मार्ट फोनवर’ चित्रित होणारा, दिग्गज कलावंत असलेला पहिला मराठी चित्रपट.

सगळे सई ताम्हणकरचे चाहते, आणि वैभव तत्ववादी चे चाहते एका चित्रपटाकडे डोळे लावून मोठ्या आतुरतेने वाट बघतायत. ह्या सिनेमाची मराठी सिने विश्वात सुद्धा कुजबुज चालू आहे, अशा ह्या नव्या चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर सोशल मीडियावर आलं. चाहत्यांच्या मनात आनंदाची कारंजी उडायला लागली ना एकदम. बिना मेकअप चे हे दोघांचे चेहेरे ह्या फोटोत दितायत. हो खरं आहे हे सई आणि वैभव पहिल्यांदाच ह्या चित्रपटात एकत्र येत आहेत, आणि त्यांचा हा फर्स्ट लूक बिना मेकअप चा पाहायला मिळाला. हँडसम वैभवला खरं तर मेकअप ची जरुरीचं नाही आणि आत्ता उत्तुंग शिखरावर असलेल्या सई ला सुद्धा मेकअप ची काही जरुरी नाही असं हा फर्स्ट लुक चा फोटोच सांगतो आहे.

मित्रांनो आता तुम्ही विचाराल, की असं नो- मेकअप चं ह्यांना का काम करायला लावलं? तर त्याचं असं आहे की ह्या चित्रपटाचं दिग्दर्शन हे ‘सचिन कुंडलकर’ करणार आहेत. आणि ह्यांचं दिग्दर्शन म्हणजे काहीतरी वेगळं असायलाच पाहिजे. म्हणून काहीतरी वेगळं म्हणजे बिना मेकअप ची हिरॉईन, आणि हीरो पण तसाच. आणखी भन्नाट गोष्ट म्हणजे हा संपूर्ण चित्रपट चित्रित केला जाणार आहे तो फक्त स्मार्ट फोन च्या कॅमेऱ्यातून. आता बोला? असलं काहीतरी असतं सचिन कुंडलकर ह्यांच्या दिग्दर्शनाचं वैशिष्ट्य. ह्या आधी कुंडलकर दिग्दर्शित ‘वजनदार’ ह्या चित्रपटात सई नेच काम केलं होतं. त्यावेळी ती खूप जाड दिसावी म्हणून तिला १५किलो वजन वाढवायला लावलं होतं. आता हा सिनेमा स्मार्ट फोनवर चित्रित केला जाणार आहे. हेच विशेष आहे. आणि म्हणून सगळीकडे कुजबुज चालू आहे. संपूर्ण चित्रपट आणि स्मार्ट फोनवर??? हे काहीतरी विचित्रच वाटतंय ना. पण नाही ह्या चित्रपटाचे चित्रण म्हणजे एक कार्यशाळाच आहे असं वाटतंय असं सई म्हणते. म्हणजे ह्यातून सुद्धा कलाकारांना काहीतरी वेगळं शिकायला मिळणार आहे ह्याचा आनंद आहे. ह्या विशेष काहीतरी असणाऱ्या सिनेमाचं नाव आहे “पॉंडीचेरी”. आणि ह्याचं संपूर्ण शूटिंग फक्त ‘पॉंडीचेरीतच’ होणार आहे. हे आणखी एक विशेष .

 

READ ALSO :  उपेंद्र लिमये ‘सूर सपाटा’ मध्ये साकारणार गावठी कबड्डी प्रशिक्षक

आणखी विशेष म्हणजे ह्या स्मार्ट फोनवर चित्रित होणाऱ्या भन्नाट चित्रपटात सई आणि वैभव तर काम करणारच आहेत, शिवाय नीना कुलकर्णी, अमृता खानविलकर, आणि महेश मांजरेकर हे दिग्गज कलाकार महत्वाच्या भूमिकांमधे आपल्याला दिसणार आहेत. म्हणजे बघा आता तुम्हीच, की कसला भन्नाट असणार आहे हा स्मार्ट फोन चित्रपट. काहीतरी ‘हटके’ असणार ह्या सिनेमात, म्हणून ही सगळी भारी स्टारकास्ट. हे काहीतरी नवीन पहायची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे. म्हणून हे सगळे चाहते ह्या चित्रपटाकडे डोळे लावून आतुरतेने वाट पाहतायत. ह्या स्मार्ट फोन चित्रपटाला आमच्याही शुभेच्छा.

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author