‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्न

शिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.

हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य इतिहासाची महती सांगणाऱ्या उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्यदिव्य मराठी चित्रपटाची घोषणा आणि पहिल्या पोस्टरचा अनावरण सोहळा कोंढणपूर, पुणे येथे दिनांक ५ जून रोजी सकाळी ९ वाजता पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ ज्या किल्यावर रोवली अशा तोरणा आणि स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड या किल्यावरुन हेलीकॉप्टरने चित्रपटाचे पोस्टर आकाशात लाँच करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती होण्याचा बहुमान हंबीरराव मोहिते यांनी मिळवला. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या सोहळ्याला, चित्रपटाचे लेखक/दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे, निर्माते संदीप रघुनाथराव मोहिते पाटील, धर्मेंद्र सुभाष बोरा व सौजन्य सुर्यकांत निकम तसेचमराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरे,धैर्यशील मोहिते पाटील, तळबीड गावचे सरपंच जयवंत नाना मोहिते पाटील, एस. पी. मिलिंद मोहिते पाटील, एडव्होकेट सुभाष मोहिते, एडव्होकेट प्रशांत मोहिते, सुरेश मोहिते, शिरीष मोहिते, गणेश मोहिते, अरविंद मोहिते, रोहित मोहिते, प्रतिक मोहिते, विक्रांत मोहिते,उद्योजक आणि निर्माते अभिजित भोसले, उद्योजक शेखर जावळकर, अमित गायकवाड, माधव सुर्वे, सुनील पालकर, विनोद वणवे, विशाल चांदणे, महेश हगवणे, अमोल धावडे, सुर्यकांतजी निकम, सुभाषजी बोरा, सुरज भिसे, तुषारजी भामरे, रणजीत ढगे पाटील, अभयसिंग अडसूळ,अभिनेते रमेश परदेशी, सुनील अभ्यंकर,किरण यज्ञोपवित, देवेंन्द् गायकवाड, संगीतकार नरेंद्र भिडे, गीतकार प्रणीत कुलकर्णी, शिवव्याख्याते सौरभ महेश कर्डे, कला दिग्दर्शक एकनाथ कदम,मार्केटिंग सल्लागार विनोद सातव इ. मान्यवर उपस्थित होते.

 

सुपरहिट ठरलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

कुठल्याही स्टुडीओचे पाठबळ नसताना, केवळ समाजभान जपणाऱ्या विषयाच्या बळावर प्रविण तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने घवघवीत यश मिळवले. ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातून प्रविण तरडे आता ऐतहासिक विषयाला हात घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. चित्रपटाचे निर्माते संदीप रघुनाथराव मोहिते पाटील आपल्या व्यवसायाबरोबरच ‘शिवनेरी फाउंडेशन’ आणि ‘सरनौबत हंबीरराव प्रतिष्ठान’ या समाजसेवी संस्थांच्या अंतर्गत ते विविध सामाजिक कार्य आणि उपक्रम राबवत असतात. तसेच, निर्माते सौजन्य सुर्यकांत निकम हे उद्योजक आणि पुण्यातील प्रसिद्ध विजय टॉकीजचे मालक असून शिवाजी महाराजांवर असलेले प्रेम म्हणून ते हेलिकॉप्टर मधून गडकिल्ल्यांची सफर हा उपक्रम राबवतात. तसेच निर्माते धर्मेंद्र सुभाष बोरा हे ऑटोमोबाईल क्षेत्रात व्यवसाय करत असून ‘मुळशी पॅटर्न’च्या निमित्ताने प्रविण तरडे यांच्या कामाच्या पद्धतीवर प्रभावित होऊन त्यांच्याबरोबर काम करायचं, या उद्देशांनी ते या चित्रपटाच्या निर्मितीत सहभागी झाले आहेत.

‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते व इतर महत्वाच्या भूमिका पडद्यावर कोण साकारणार याबद्दल औत्सुक्य निर्माण झाले आहे, तसेच लवकरच चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात होणार असल्याचे आणि २०२० सालच्या सुरुवातीला हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येईल, असे चित्रपटाचे लेखक/दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांनी सांगितले.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

Review

0%

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा...
0%

About The Author