प्रसाद ओक म्हणतो कच्चा लिंबू

प्रसाद ओक म्हणतो कच्चा लिंबू

मराठी चित्रपट सृष्टीत आजपर्यंत अनेक विविध विषय हाताळणारे चित्रपट येऊन गेले. काही प्रेमकथा असतात , काही गूढ कथा तर काही माहितीपट. विविध आजार त्यांची लक्षण आणि त्या आजाराचा  आजारी माणसा-बरोबरच त्याच्या घरच्या मंडळींवर किंवा त्याची देखभाल करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेणारे अनेक चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीत येऊन गेले आहेत. श्वास हा चित्रपट ही तशाच चित्रपटांचे एक उदाहरण होय. येल्लो हा देखील त्याच पठडीतील पण काहीसा वेगळा असा चित्रपट होय. २०१७ या वर्षी प्रदर्शित झालेला कच्चा लिंबू हा चित्रपट त्याचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.

चित्रपटातील कलाकार

कच्चा लिंबू या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, रवी जाधव, सचिन खेडेकर, मनमीत पेम हे कलाकार आहेत. प्रसाद ओक यांने कच्चा लिंबू दिग्दर्शित केला आहे. एक मुलाखतीत प्रसाद ओक याने त्याच्या कच्चा लिंबू मधल्या कलाकारांबद्दल अनेक गोष्टी नमूद केल्या. चित्रपटातील इतर भूमिकांना दुसरे कलाकारही चालतील परंतु सचिन खेडेकर यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेला त्यांच्याशिवाय पर्याय नाही एवढया उत्तम प्रकारे त्यांनी ती भूमिका वठवली आहे. दिग्दर्शक म्हणून बराच अनुभव असलेल्या रवी जाधव यांचा अभिनेता म्हणून हा पहिलाच चित्रपट.सोनाली कुलकर्णी हिला कच्चा लिंबू या चित्रपटासाठी विचारणा झाल्यनंतर तिच्याकडून लगेचच होकार कळवण्यात आला

प्रसाद ओक याने मुलाखतीत सांगितले की चित्रपटाच्या इतर पात्रांना काहीना काही आधार आहेच पण सचिन खेडेकर यांचे पात्र एकमेक असे होते ज्याला ऑथर बॅकिंग नाही आहे त्यामुळे ती भूमिका आव्हानात्मक आहे.

चित्रिकरण करतानाचे वातावरण

सुरुवातीला चित्रपट सृष्टीत कृष्ण धवल चित्रपट असायचे. हळूहळू तंत्रज्ञानात बदल आणि सुधारणा झाली व रंगीत चित्रपट येऊ लागले. साधारण गेली तीस पस्तीस वर्षे रंगीत चित्रपटच येत आहेत .रंगीत चित्रपटांच्या प्रवाहात काहीतरी वेगळे असावे म्हणून प्रसाद ओक याने कच्चा लिंबू हा चित्रपट कृष्ण धवल केला. कृष्ण धवल चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी वापरण्यात येणारे लाईट्स वेगळे होते.कच्चा लिंबू हा कृष्ण धवल  चित्रपट असल्याने चित्रीकरणाच्या काही पद्धतींमध्येही बदल होते. कच्चा लिंबू चे चित्रीकरण करणाऱ्या गटातील कलाकारांनी रंगीत चित्रपटासाठीकाम केले होते परंतु कृष्ण धवल चित्रपटाचे काम पहिल्यांदाच करत असल्याने या सेट वर चित्रीकरणा दरम्यान उत्साहाचे उत्सुकतेचे वातावरण होते ,कारण प्रत्येक गट नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करत होता.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Crisenta Almeida

"Crisenta Almeida is a seasoned writer who goes by the description, WRITER BY DAY. READER BY NIGHT. She has been a writer with the content industry for a good number of years, which inspired her to start her content agency. Madly in love with storytelling, she knows how to weave a tale."