अमोल कागणे आणि प्रतिक्षा मुणगेकरची जमली जोडी

अमोल कागणे आणि प्रतिक्षाची मुणगेकरची जमली जोडी

‘कियारा’ हे नाव सध्या घराघरांत ऐकू येतंय. महिलावर्गातून बऱ्याचदा निंदा-नालस्तीची बळी ठरणारी ही व्यक्तिरेखा आहे ‘घाडगे आणि सून’ या मालिकेमधील. कियारा उर्फ *प्रतीक्षा मुणगेकरचा* करिअर ग्राफ उंचावणारी ही भूमिका सध्या प्रचंड प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत व्हिलनिश भूमिकेत दिसणारी प्रतीक्षा लवकरच तुम्हाला एका हटके भूमिकेत दिसणार आहे. ‘बाबो’ या आगामी चित्रपटात प्रतीक्षा आणि अमोल कागणेची जोडी जुळवण्यात आली असून अमोलची प्रेयसी म्हणून रसिकांच्या भेटीस येईल. नटखट, प्रेमळ-लाघवी आणि तितकीच समंजस प्रतीक्षा श्रीमंत घराण्यातली आहे उलट अमोल हा मध्यम वर्गीय. अमोल आणि प्रतिक्षाच्या प्रेमाला समाज मान्यता लाभणार का ? त्यांचं प्रेम यशस्वी होतं का ? घरच्यांचा विरोध श्रेष्ठ कि प्रेम ? काठ-शाहचा हा खेळ गमतीशीर पद्धतीने ‘बाबो’ मध्ये मांडला आहे.

 

READ ALSO : बहुचर्चित ‘बाबो’चा फर्स्ट लुक प्रदर्शित

अमोल कागणे या तरुणाने पदार्पणातच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये यशस्वी निर्मात्याचे बिरुद पटकावलं. अमोल लक्ष्मण कागणेने खऱ्या अर्थाने मराठी मनोरंजनक्षेत्राला नवसंजीवनी मिळवून दिली आहे. ‘हलाल’, ‘लेथ जोशी’ आणि ‘परफ्युम’ या चित्रपटांच्या यशस्वी निर्मितीनंतर आत्ता अमोल कागणे अभिनयक्षेत्रासाठी सज्ज झाले आहेत. पुण्यामधील ललित कला केंद्रातून नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलेल्या अमोल कागणेने तब्ब्ल २६ हुन आधी नाटकांत अभिनय केला आहे. तर प्रतीक्षा मुणगेकर या नवोदित अभिनेत्रीने ह्या आधी ‘विडा एक संघर्ष’ आणि ‘मातंगी’ यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिलेली आहे. शिवाय ‘कियारा’ हे तिचे सध्या गाजत असलेले पात्र सध्या अतिशय लोकप्रिय आहे.

मल्हार फिल्म्स क्रिएशन्सचा ‘बाबो’ ह्या चित्रपटातून अमोल आणि प्रतीक्षा ह्यांची युथफूल जोडी आपल्यालाही प्रेमात पडेल अशीच आहे. रमेश साहेबराव चौधरी दिग्दर्शित ‘बाबो’ या चित्रपटात अमोल आणि प्रतीशची लव्हेबल केमिस्ट्री म्हणजे प्रेक्षकांसाठी रोमँटिक ट्रीट असणार आहे.

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author