काय गोड बातमी देणार प्रिया बापट आणि उमेश कामत?

काय गोड बातमी देणार प्रिया बापट आणि उमेश कामत?

प्रिया बापट आणि उमेश कामत ही मराठी चित्रपटसृष्टीतील लाजवाब जोडी आहे. दोघांचे अनोखे प्रेम सर्व मराठी प्रेक्षकांना माहीतच आहे. ती अवखळ अन खट्याळ तर तो शांत समंजस. ते दोघे जणू दोन भिन्न ध्रुवांचे टोक तरीही प्रेम अपार. प्रिया व उमेश यांचे जरा हटके प्रेम सर्वांनाच परिचित आहे. ते दोघेही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहेत आणि अगदी खुलेपणाने त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट टाकतात. ते त्यांच्या चाहत्यां बरोबर नेहमीच संवाद साधतात. त्यांचे चाहतेही त्यांच्या आवडत्या अभिनेता व अभिनेत्री यांच्या आयुष्यात घडणार्‍या घडामोडी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. यावेळीदेखील उमेश कामत याने त्यांच्या चाहत्यांसाठी काही खास मेजवाणी आयोजित केली आहे त्याबद्दल जाणून घेऊया…

अशीच एक गोड बातमी प्रिया बापटने नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. ‘एक गोड बातमी आहे’ या कॅप्शनसह उमेशने प्रियाला प्रेमाने जवळ घेतलेला सुंदर आणि रोमँटिक फोटो या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांकडून आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या सहकाऱ्यांकडून दोघांवर शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. प्रिया आणि उमेशच्या आयुष्यात नवा पाहुणा येणार असल्याच्या चर्चा या पोस्टमुळे सुरू झाल्या असून दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

 

READ ALSO : मुंबई पुणे मुंबई ३ मधील या खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

लवकरच उमेश कामत पत्नी प्रिया बापटसह एका सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. जवळपास ४ वर्षांनंतर ही रिअल लाइफ जोडी रिल लाइफमध्ये एकत्र येणार आहे. मात्र या सिनेमाची कथा, दोघांची भूमिका याबाबत अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. त्यामुळे उमेश आणि प्रियाच्या या आगामी सिनेमाची रसिकांना नक्कीच उत्सुकता असेल. उमेश कामतने दोघे एकत्र काम करत असल्याचे सोशल मीडियावर सांगितले असले तरी अद्याप या चित्रपटाची कथा व शीर्षक समजू शकलेले नाही. पण एक मात्र नक्की आहे की ते दोघेही पुन्हा एकदा धमाल करतील.. उमेश तुला व प्रियाला एकत्र अभिनय करताना पहायला तुमच्या चाहत्यांना खूप आवडेल यात काहीच शंका नाही. तुम्ही दोघे असेच प्रगती करा आणि रसिक प्रेक्षकांसाठी नवीन चटकदार अभिनयाची मेजवाणी घेऊन यावे अशीच सर्वांची इच्छा.

उमेश व प्रिया तुम्हा दोघांना तुमच्या आगामी मराठी चित्रपटासाठी फिल्मीभोंगा मराठीकडून खूप खूप शुभेच्छा…

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

About The Author