प्रियदर्शन जाधव प्रेक्षकांना लावतोय ‘मस्का’

प्रियदर्शन जाधव प्रेक्षकांना लावतोय ‘मस्का’

“नेलं साठवलेलं गाठोड बया, केलं पब्लिकचं गं वाटोळ बया. या दोन ओळीच चित्रपटाविषयी खूप काही सांगून जातात. फसवणूक करणाऱ्यांचा आणि फसवणूक होणाऱ्यांचा चित्रपट.” Con movie. मराठी चित्रपटांसाठी नवीन नसला तरी हा वारंवार बनणाऱ्या चित्रपटांचा प्रकार नाही. आणि असा चित्रपट बनविण्याचं धाडस केलंय प्रियदर्शन जाधव याने ‘मस्का’ चित्रपटाच्या निमित्ताने, ते हि त्याच्या दिग्दर्शन पदार्पणातच.

माया.. सुचित्रा.. भाभी.. अशा तऱ्हेतऱ्हेच्या भूमिका वठवून लोकांना गंडवणाऱ्या चालू मुलीची आणि तिच्याकरवी लुबाडले गेलेल्या २ तरुणांची कि कथा आहे. अनिकेत विश्वासराव हा तिचा नवीन बकरा असून चिन्मय मांडलेकर तिचा जुना बकरा आहे. लुबाडले गेलेले हे दोघे, अनिकेत आणि चिन्मय त्या चालू मुलीच्या म्हणजेच प्रार्थना बेहेरेच्या शोधात आहेत. परंतु अशा प्रकारच्या चित्रपटामध्ये कोण कोणाच्या मागे आहे हे सांगणं जरा घाईचं ठरू शकेल. कदाचित अनिकेत आणि चिन्मयला ती मुलगी दुसऱ्या कुठल्यातरी जाळ्यात अडकवायचा प्लान करत असेल! असो पण संजय जाधवच्या ‘चेकमेट’ चित्रपटानंतर मराठीत चांगली Con Movie आली आहे .. तिचं आपण स्वागतच करायला हवं.

गेल्या आठवड्यात या चित्रपटातील एक गाणं.. गाणं कसलं आधुनिक भारुडच म्हणा.. ते प्रदर्शित करण्यात आलं. मंगेश कांगणे यांची उत्तम गीतरचना असलेलं असं हे आधुनिक भारुड night club मध्ये चित्रित केलं गेलेलं आहे. आणि त्याचे गायक आहेत

मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख प्राध्यापक गणेश चंदनशिवे. पूर्वीच्या काळी ‘भारुड’ हे उपहासात्मक बोलून किंवा मस्तीमध्ये कोपरखळी मारून लोकांना त्यांच्यातील अवगुण दाखविण्यासाठी वापरलं जायचं. संत एकनाथ महाराज याचे जनक आहेत.

त्याच भारुडाचा चित्रपटाच्या गाण्यामध्ये अतिशय सुंदर वापर करून घेत, अतिशय हलक्या फुलक्या पद्दतीने प्रार्थना बेहेरे जी ‘Con girl’ आहे तिच्यातील अवगुण लोकांसमोर ठेवण्यात आलेले आहेत. त्या गाण्यातील काही ओळी अशा आहेत कि

साळसूद रूप.. घालतंय घाला,
शेजार पाजार बेजार झाला..
आचरट गुणं.. वात्रट चाळा,
थापांच्या दरीत घसरून मेला..
जळक्या सुंभाचं गं येटोळं बया !
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया !

अमोल जोशी  प्रॉडक्शन्स आणि स्वरूप रिक्रिएशन्स अँड मिडिया प्रा. ली. प्रस्तुत ‘मस्का’ या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे मोरेश्वर प्रॉडक्शन्सचे प्रशांत पुरुषोत्तम पाटील यांनी चित्रपटाला संगीत दिलंय चिनार – महेश यांनी तर चित्रपटाचे छायांकन केलेलं आहे अमलेंदू चौधरी यांनी. निलेश नवनाथ गावंड यांनी संकलनाची बाजू सांभाळलेली आहे आणि नृत्य दिग्दर्शन केलंय अमोल सकपाळ यांनी.

विनोद आणि रहस्याने भरलेल्या रोमांचकारी प्रवासाला दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव सगळ्या रसिक प्रेक्षकांना घेऊन जाऊ इच्छितात.. त्यासाठी त्यांनी टीझर, चांगले कलाकार, त्यांचे HOT अवतार, डोलायला लावणारं संगीत आणि ट्रेलर यांचा मस्का प्रेक्षकांना लावलेला आहेच. आता हे पाहायचं आहे कि हा ‘मस्का’ किती यशस्वी होतोय ते.

मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडीं आणि गमती-जमती जाणून घेण्यासाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.