पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये हा मराठी चित्रपट ठरलाय ‘सर्वोत्कृष्ट’.

पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये हा मराठी चित्रपट ठरलाय ‘सर्वोत्कृष्ट’.

बॉलिवूडच्या दिग्गज कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांना आता मराठी सिनेमाचं वेड लागलंय, हिंदीतले बरेच लोक आता मराठी चित्रपटाकडे आकर्षित झालेत. गेले दोन तीन वर्षे मराठी चित्रसृष्टी बहरलेली दिसते आहे हे गेल्या दोन तीन वर्षातल्या एकापेक्षा एक आलेल्या उत्कृष्ट चित्रपटांनी सिद्धच करून दाखवलंय, आणि बॉक्स ऑफिसवर चांगलीच पकड धरून ठेवली आहे हे अनुभवायला मिळालं. मराठी चित्रपटांचा दर्जाच खूप उंचावलेला दिसतो आहे. उत्कृष्ट अभिनेते, अभिनेत्री, उत्कृष्ट पटकथा, उत्कृष्ट दिग्दर्शन ह्या सगळ्याच गोष्टी सरस ठरल्या आहेत, त्यात नवीन तंत्रज्ञान हे एक मोठं कारण आहे. त्यामुळे हे सगळे चित्रपट खूपच गाजले, आणि चांगली कमाई केली.

ह्या सगळ्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये एक खूपच वेगळ्या विषयावर आधारलेला चित्रपट मोठी रिस्क घेऊन मैदानात उतरला. विषय खूपच वेगळा, असा विषय की ज्यात काहीही मसाला, सुंदर अभिनेत्री, किंवा ठेकेदार गाणी, असलं काहीही नाही. ह्यातली मुख्य भूमिका साकार करणारा नायक हा अभिनेता म्हणून पहील्यांदाच सिनेमात काम करतोय, कथा सुद्धा नवीन विषय लोकांसमोर मांडणारी. विषय सुद्धा जरा हटकेच, म्हणजे “गतिमंद” व्यक्तीच्या जीवनावरचा. पण मित्रांनो ….. हा नवा चित्रपट पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये “सर्वोत्कृष्ट” मराठी चित्रपट म्हणून नावाजला गेला आहे. उत्कृष्ट म्हणून मिळतात ती सगळी अवॉर्डस ह्या चित्रपटाने घेतलीत.

 

READ ALSO :  बॉलिवूड मुळे झाली मराठी चित्रपटांची दैना.. त्यांना कधी थेटर तर कधी जास्ती शोजच मिळेना..

हिंदीतला नावाजलेला हीरो ‘अक्षय कुमार’ निर्माता म्हणून मराठी चित्रपटाकडे वळला. त्याने त्याला फारच आवडलेली एक कथा निवडली आणि “चुंबक” हा चित्रपट तयार झाला. गतिमंद व्यक्तीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या स्पर्धेत उतरवला. आणि सर्वोत्कृष्ट पटकथा म्हणून पाहिला , सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं दुसरा, आणि हा चित्रपटच सर्वोत्कृष्ट म्हणून तिसरा ,असे तीन पुरस्कार मिळवले. म्हणजे कोणत्या दर्जाचा हा चित्रपट आहे हे कळतं. असे दर्जेदार चित्रपट आता मराठी चित्रपट सृष्टीत तयार होत आहेत , म्हणजे हा मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळच म्हणता येईल. ह्या चित्रपटाचा नायक म्हणजे ‘स्वानंद किरकिरे’ त्यांनी अभिनय केलेला हा पहिलाच चित्रपट, पण इतका सफाईदार अभिनय, आणि तो सुध्दा एका गतिमंद व्यक्तीचा रोल. अवघड जबाबदारी सहज पेलून सर्वोत्कृष्ट होणे म्हणजे सोपी गोष्ट निश्चितच नाही. स्वानंद किरकिरे हे अभिनेते म्हणून अनुभवी नसले तरी गेली अनेक वर्षे ते पटकथा लेखन करत असल्यामुळे त्यांना अभिनय करणे सहज सोपं काम होतं. आणि त्यांनी त्यात जबरदस्त यशही मिळवलं. अभिनय शिक्षण घेणाऱ्या मंडळीना ह्यातून निश्चितच काही तरी शिकायला मिळणार आहे. असले वेगळ्याप्रकारचे चित्रपट काढायचे म्हणजे एक चॅलेंजच आहे, आणि ते चॅलेंज अक्षय कुमार सारख्या हरहुन्नरी कलाकाराने घेतलं आणि यशस्वी करून दाखवलं.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author