रंगपंचमीला रंगली ‘पुणेरी’ पाट्या आणि तिरकस बाणांची मैफल…!

रंगपंचमीला रंगली ‘पुणेरी’ पाट्या आणि तिरकस बाणांची मैफल

पुणे, दि. २५ – जांभाया टाळण्याचा उत्तम उपाय ‘झोपा’, मतदार दुपारी झोपेत असतात बेल वाजवू नये मत मिळणार नाही, पुणे तिथे काही नसे उणे, आपला मान इथेच सोडायचा आणि प्रवेश करायचा, इथे फक्त आमचाच मान असतो, आमचे इथे ठोक भावात अपमान करून मिळेल अशा टिपीकल ‘पुणेरी’ पाट्या आणि तिरकस बाणांची मैफल फर्ग्युसन रस्त्यावर सोमवारी सायंकाळी अवतरली. निमित्त होते पुणे टॅाकीज प्रा. लि. च्या वतीने “६६ सदाशिव” या आपल्या पहिल्या मराठी चित्रपट निर्मितीचा आनंद रंगपंचमीच्या निमित्ताने पुणेकरांना लार्ज कॅनव्हासवर व्यक्त होण्याच्या केलेल्या आवाहनाचे.

 

READ ALSO : ‘धुमस’ चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा दिमाखात संपन्न

चित्रपटाचे निर्माते हेमंत गुजराथी, विनय वाकलकर, सौरभ चिंचणकर यांनी पुणेकरांना, रंगपंचमीचा रंगोत्सव आनंद देणारा ठरावा यासाठी वॉल पेंट, सुभाषित, सेल्फी पॅाईंट व चित्र रेखाटन यासह, पुण्याच्या गुणवैशिष्टयांचं ब्रश-रंग- यांचा वापर करून रंगांची ऊधळण करून, नव्या पुण्याच्या स्मार्ट उपक्रमांत भर घालण्यासाठी हे आयोजन केले होते. काही पुणेकरांनी शब्दांबरोबरच चित्र आणि व्यंगचित्र रेखाटत आपल्या भावना व्यक्त केल्या.

“६६ सदाशिव” हा योगेश देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित चित्रपट, पुण्याच्या काही भन्नाट स्वभाव-गुणधर्मांचं हटके दर्शन घडवणार आहे. त्यामुळे हा “६६ व्या कलेचा, आगळा-वेगळा ऊपक्रम राबविण्यात आला. यावेळी निर्माते, दिग्दर्शक, चित्रपटातील कलाकार-तंत्रज्ञ उपस्थित होते. “६६ सदाशिव” हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author