Pushpak Viman : Movie Review

आजोबा आणि नातवाची एक प्रेमळ गोष्ट, नातवाच्या डोळ्याने आजोबा आपले जग बघतात. “आजोबा म्हणजे नातवाचा पहिला मित्र आणि नातू म्हणजे आजोबांचा शेवटचा मित्र.” या वाक्यात जे मर्म लेखकाने सांगितले आहे ते सर्व काही आहे. तर आपण बोलत आहोत. नुकताच प्रदर्शित झालेला पुष्पक विमान याबद्दल, या चित्रपटात आजोबा आणि नातवाची अजब कथा आहे. चित्रपटातील आजोबा नातवाची आतुरतेने वाट पाहत असतात. पण नातू काही येत नाही. पण अचानक एक दिवस आजोबा आजारी पडतात. त्यांना बघण्यासाठी व त्यांची काळजी घेण्यासाठी नातू येतो. आणि खूप आग्रह करून गावातील आजोबांना मुंबईला घेऊन येतो. मुंबईबाबत आजोबा अनभिज्ञ असतात, मुंबई बरोबर जुळून घेण्याचा त्यांचा प्रवास व त्याच वेळी गावाकडे माघारी जाण्याची ओढ त्यातून तुकारामांच्या पुष्पक विमानाने प्रवास करण्याचा अट्टहास. नातू हा सर्व साधारण परिस्थितीत असणारा त्यातून आजोबांच्या पुष्पक विमान स्वारीसाठी सर्वोतरी प्रयत्न करणारा. एकूणच चित्रपट खूप भावनिक आहे.

चित्रपटाच्या सुरुवातीला ही कथा सामान्य व रटाळ आहे असे वाटते, पण कथानक जसजसे पुढे जाते तसतसे त्यातील गांभीर्य आणि मर्म उलघडते. मोहन जोशी यांनी आजोबांची भूमिका अतिशय उत्तम साकारली आहे आणि तसेही मोहन जोशी यांच्या अभिनयाबद्दल आपण काय बोलू शकतो एक अतिशय उत्तम अभिनेते म्हणुन अशी त्यांची ख्याती आहे. सुबोध भावे यांनी ही नातवाच्या भूमिकेला न्याय दिला आहे. स्मिता च्या व्यक्तिरेखेला नवोदित असूनही गौरी महाजन हिने पुरेपूर न्याय दिलेला आहे.

तात्या आणि स्मिता यांच्या संवादातून बाप व लेक यांच्या नात्यातील गोडवा तसेच आजोबा आणि नातसुनेचे नाते ही हळुवार पणे उलगडते.

एक पाहता चित्रपट उत्तमरीत्या मांडला आहे. व चित्रपटांबरोबरच त्यात खानदेशी भाषेतील विनोदाचा वापर योग्य प्रमाणात केल्यामुळे चित्रपट अधिक रित्या प्रेक्षकांना भावतो.

वैभव चिंचाळकर यांनी चित्रपटाला योग्य न्याय दिला आहे. तसेच कलाकारांची निवड ही खूप योग्य आहे. फिल्मी भोंगा या चित्रपटाला पाच पैकी तीन स्टार देत आहे. तर तुम्ही तुमच्या आजोबांच्या आठवणी ताज्या करण्यासाठी जरूर ” पुष्पक विमान ची ”  सफर करा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author