पुष्पक विमान” घेणार उड्डाण ३ ऑगस्ट रोजी

“पुष्पक विमान” घेणार उड्डाण ३ ऑगस्ट रोजी

          झी स्टुडीओच्या आगामी “पुष्पक विमान” या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला आहे. ज्यात अभिनेता मोहन जोशी आणि सुबोध भावे, जे या चित्रपटात आजोबा आणि नातवाच्या भूमिकेत आहेत, मरीन ड्राईवच्या कट्ट्यावर पाठमोरे बसलेले आहेत. त्यांच्या पाठीवरच चित्रपटाच्या संकल्पनेची कॉमेंट्री सुरु होते… नातवाचा सगळ्यात पहिला मित्र त्याचे आजोबा असतात, तर आजोबांचा सगळ्यात शेवटचा मित्र म्हणजे नातू असतो. म्हणजेच मैत्रीसाठी आजोबा, नातवाची सुरुवात आणि नातू, आजोबांचा शेवट असतो. अशा अतिशय सुंदर संकल्पनेवर आधारित हा चित्रपट ३ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.

         टीझर पाहून चित्रपटाची कथा त्याचं नाव यांबद्दल जास्त मोठा उलगडा होऊ शकत नाही. पण आपण अंदाज बांधायचा झालंच तर, टीझरच्या शेवटी जेव्हा चित्रपटाचं नाव येतं तेव्हा तुकाराम महाराजांचा “आनंदाचे डोही आनंद तरंग” हा अभंग वाजतो. चित्रपट तयार करणाऱ्यांना यातून चित्रपटाच्या आशयाविषयी काहीतरी सूचित करायचं आहे. अभंगाच्या पहिल्या ओळीचा अर्थ आहे, आनंदाच्या डोहामध्ये आनंदाचेच तरंग किंवा लाटा उठतात, म्हणूनच आपण स्वतः तो आनंदाचा डोह बनायला पाहिजे. म्हणजे येणाऱ्या लाटा हि आनंदाच्याच असतील. अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याकडे असेल त्या गोष्टीमध्ये समाधान मानून नेहमी खुश, आनंदमय राहायला हवं आणि दुसऱ्यांना हि आनंदी करायला हवं. तरच तो आनंद परत आपल्याकडे येईल. असाच काहीसा चित्रपटातील आशय असावा.

“पुष्पक विमान” हे असं चित्रपटाचं नाव का असावं ?  याचा अंदाज बांधायचा झालाच तर, पुष्पक विमान हे चित्रपटाच्या कथानकाशी संबंधित असलेलं खरोखरचं विमान असू शकतं, कारण चित्रपटाच्या नावामध्ये एक विमान असल्याचं दिसतंय जे कि आधुनिक विमानासारखं आहे. किंवा पुष्पक विमान हे नाव सूचक अर्थानेही वापरलं गेलेलं असू शकतं. या पुष्पक विमानाचा उल्लेख आपल्याला रामायणात पाहायला मिळतो. रावणाने सीता मातेला या पुष्पक विमानातूनच पळवून नेलं होतं. पण टीझरमधील  तुकाराम महाराजांच्या अभंगाचा केलेला उल्लेख पाहता, ह्या चित्रपटातील पुष्पक विमानाचा संदर्भ हा त्या विमानाशी जोडला जाऊ शकतो, ज्यातून तुकाराम महाराज मोक्ष मिळवून सदेह वैकुंठाला गेले होते. कदाचित मोक्ष या संकल्पनेबद्दल आजोबा आणि नातावामध्ये असलेल्या दोन विचार प्रवाहावर हा चित्रपट भाष्य करत असेल !

ते काहीही असलं तरी ऐके काळी आजोबा आणि नातवाच्या नात्यावर आधारित ‘श्वास’ नावाच्या चित्रपटाने मराठी चित्रपटाला ऑस्करपर्यंत नेऊन ठेवलं होतं. आता पाहायचं हेच आहे कि, झी स्टुडीओचा हा आजोबा आणि नातू यांच्या मैत्रीपूर्ण संबंधाने फुललेला ‘पुष्पक विमान’ हा चित्रपट काय कमाल दाखवतो ते.

झी स्टुडीओ, कान्हाज Magic, श्री गणेश मार्केटिंग and फिल्मस, मायदेश मिडिया, Beyond मिडिया प्रोडक्शन्स प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते आहेत, मंजिरी सुबोध भावे, अरुण जोशी, सुनील फडतरे, मिनल श्रीपत इंदुलकर, मुकेश पाटील. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय वैभव रा. चिंचाळकर यांनी.

मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडीं आणि गमती जमतीं जाणून घेण्यासाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.