पुष्पक विमान

पुष्पक विमान

एक नात, एक विश्वास, एक ध्यास, एक आस, एक जिव्हाळा, एक आपलेपणा, एक निवांत जागा, अशा विविध अंगी असलेल्या आजोबा आणि नातवाची एक अटूट नात. आपल्यला अनुभवायला मिळणार आहे, “पुष्पक विमान” या चित्रपटाद्वारे.

आजोबाच्या भूमिकेत मोहन जोशी असणार आहे तर नातवाच्या भूमिकेत सुबोध भावे असणार आहे. पुष्पक विमान या चित्रपटाद्वारे वैभव चीनचालकर दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. वैभव चीनचालकर हे नाव मराठी टेलिविजन क्षेत्रात खूप प्रसिद्ध आहे. वैभव चीनचालकर यांनी आयरिश प्रॉडक्शन यांच्या बर्‍याच मालिका दिग्दर्शित केलेल्या आहे. एकूणच त्यांच्या दिग्दर्शनाचा प्रवास आयरिश प्रॉडक्शन सोबत सुरू केला. आता ते मराठी चित्रपट क्षेत्रात झी स्टूडियो सोबत पदार्पण करत आहे. झी स्टूडियो नेहमीच नवीन कलागुणांना वाव देत आहे. झी स्टूडियो सतत  नवनवीन विषय घेऊन प्रेक्षकांना मनोरंजनाबरोबर बर्‍याच विषय जे अजून अनभिज्ञ आहे, ते घेऊन येत आहे.

झी स्टुडिओ प्रस्तुत ‘पुष्पक विमान’ नक्कीच एक अप्रतिम असा नवीन विषय घेऊन येत आहे. पुष्पक विमान ही कथा आहे, एक आजोबा आणि नातवाची, आजोबांचा त्यांच्या उतार वया तील त्यांचा एक सच्चा मित्र तो म्हणजे त्यांचा नातू. तात्या म्हणजे मोहन जोशी आणि त्यांचा सच्चा मित्र म्हणजे सुबोध भावे. प्रेक्षकांना नक्कीच हा चित्रपट मनाला भावणार. कुठल्याही प्रकारे या चित्रपटाला गांभीर्याने न बनविता हा विषय अगदी हलक्या फुलक्या विनोदी पद्धतीने निर्माण करण्यात आलेला आहे.

तात्यांच्या अनेक गोष्टी त्यांचे अनुभव व संत तुकाराम महाराज यांच्या ओव्या यांचा सुरेख असा मिलाप आपल्याला या चित्रपटाद्वारे अनुभवायला मिळणार आहे.

पुष्पक विमान येत्या ३ ऑगस्ट ला उड्डाणासाठी सज्ज होणार आहे. तर आपण सर्व या पुष्पक विमान तील आपली तिकीट बुक करू या.

मी तर पुष्पक विमानातील माझे तिकीट बुक केले आहे,

तुमचे काय? त्वरा करा.. नाही तर विमान सुटायचे…

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

About The Author