नेटफ्लिक्ससोबत मराठमोळ्या राधिका आपटेची उत्तुंग भरारी

नेटफ्लिक्ससोबत मराठमोळ्या राधिका आपटेची उत्तुंग भरारी

२०१८ मध्ये चित्रपट ‘Lust Stories’ पाठोपाठ आलेल्या ‘Sacred Games’ या रोमांचक सीरीजनंतर राधिका आपटे आपल्याला नेटफ्लिक्सच्या तिसऱ्या प्रोजेक्टमध्ये म्हणजेच ‘Ghoul’ नावाच्या सीरीजमध्ये दिसणार आहे. या सीरीजमध्ये ती एका मिलिटरी ऑफिसरच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. हि सीरीज भयकथेवर आधारित आहे. ज्यात एका कैद्याला चौकशीसाठी मिलिटरीच्या चौकशी केंद्रात आणलं जातं. पण तो कैदी स्वतः कोणतीही गोष्ट ऑफिसर्सना सांगत नाही, उलट तो त्या ऑफिसर्सची गुपितं उघडी करतो. ‘Ghoul’ याचा अर्थ आहे एक असा राक्षस, जो माणसांचं मांस खातो व ज्याला तो राक्षस मारेल त्याचं रूप तो धारण करू शकतो.

 

READ MORE : प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांच्या घडण्याची कथा

       ७ सप्टेंबर १९८५ रोजी पुण्यामध्ये जन्मलेल्या राधिकाला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. तिने शाळा-कॉलेजमधून अनेक नाटकांमध्ये सहभाग घेतला होता. २००५ साली आलेल्या ‘वाह ! लाईफ हो तो ऐसी !’ या चित्रपटातील अंजलीच्या छोट्याशा भूमिकेतून राधिकाने सिनेसृष्ठीत पदार्पण केलं. पुढे तिने मराठी, हिंदी, तमिळ, तेलगु, मल्याळम, बंगाली आणि इंग्रजी भाषांमधील एकूण ३३ चित्रपटांमध्ये काम केलं. येत्या वर्षात तिचे अजून ५ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तसेच बऱ्याचशा शोर्ट फिल्म्स आणि मालिकांमधून हि तिने अभिनय केलेला आहे. इतक्या कमी वयात इतकं सारं काम केलेल्या राधिकाचा प्रवास वाखाणण्याजोगा आहे.

शोर्ट फिल्म्स, नाटक, मालिका आणि चित्रपटानंतर आता राधिका नेटफ्लिक्सच्या माध्यमातून वेब सीरीज या कलाप्रकारामध्ये काम करण्याचा आस्वाद घेताना दिसतेय. नेटफ्लिक्स हि इंटरनेटवर मनोरंजन सेवा पुरवणारी जगातील सगळ्यात मोठी कंपनी आहे. आणि तिने आता भारतातील व्यवसायावर आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. नेटफ्लिक्सवर सध्या १९० देशामधील साडे बारा कोटी ग्राहक आहेत. जे रोज १४ कोटी तास नेटफ्लिक्सवरील चित्रपट, मालिका आणि माहितीपट यांचा आनंद घेत आहेत. पण नेटफ्लिक्स कंपनीला हि कल्पना आहे कि भारतीयांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या भाषेत काही सीरीज आणि चित्रपट बनवणं आवश्यक आहे. ज्याची सुरुवात त्यांनी ४ लघुपटांचा समावेश असलेला ‘लस्ट स्टोरीज’ हा चित्रपट बनवून केली. ज्यातील एका लघुपटात राधिकाने अभिनय केलेला आहे.

स्मिता पाटील, माधुरी दिक्षित, उर्मिला मातोंडकर यांसारख्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रींनंतर बॉलीवूडमध्ये मराठमोळी राधिका आपटे आपल्या नावाचा झेंडा रोवणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

     मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडीं आणि गमती जमतीं जाणून घेण्यासाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.