‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हाय

हा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  ‘लागीरं झालं जी’ मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या व्यक्तिमत्त्वाने सगळ्यांचीच मनं जिंकत आलेला राहुल्या आता रुपेरी पडदा गाजवायला सज्ज झाला आहे. धोंडिबा बाळू कारंडे निर्मित-दिग्दर्शित ‘पळशीची पीटी’ या आगामी मराठी चित्रपटात राहुल एका विकास शिंगाडे नामक हवालदाराच्या भूमिकेत दिसणार आहे. ऍथलेट ‘भागी’वर आधारलेल्या या चित्रपटात तो या पळशीच्या पीटीवर हवालदिल झालेला दिसणार आहे. ही पळशीची पीटी दुसरी-तिसरी कुणी नसून जयडी उर्फ किरण ढाणे आहे हे विशेष.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये नावाजलेला ‘पळशीची पीटी’ हा चित्रपट ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करतो. साधारण कुटुंबात जन्मलेली ‘भागी’ आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा करत, नॅशनल ऍथलेट बनण्याचा मान पटकावते कि नाही? ती चित्रपटाची मध्यवर्ती कथा असून त्या अनुषंगानं येणाऱ्या घटनांना जोडणारा राहुलने साकारलेला हवालदार विकास शिंगाडे एक महत्त्वपूर्ण भूमिका वठवताना दिसेल. बघताक्षणी ‘भागी’च्या प्रेमात पडणारा विकास शिंगाडे हवालदार तिच्या स्वप्नांना मोकळं आकाश मिळवून देण्यास हातभार लावतो का? राहुल म्हणजेच हवालदार विकास शिंगाडे भागीला आपल्या प्रेमाची कबुली देतो का? या आणि अशा उत्कंठावर्धक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ‘पळशीची पीटी’ पाहायलाच हवी.

तरुणांमध्ये प्रचंड प्रसिद्ध असणारा ‘राहुल्या’. या प्रेमळ दोस्ताला त्याच्या ‘पळशीची पीटी’ मधील व्यक्तिरेखेविषयी विचारले असता, ”आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. समोरच्याने आपल्यावर विश्वास दाखवत दिलेली नवनवीन कामं हेच मी माझं यश मानतो. दिग्दर्शक धोंडिबा बाळू कारंडे यांनी मला या चित्रपटासाठी विचारताच माझा कॉन्फिडन्स खरंच सांगतो तिपटीने वाढलाय.” असं हसतच सांगतो. ग्रामीण भागातील उदासीन शिक्षणपद्धतीवर भाष्य करणारा ‘पळशीची पीटी’ हा चित्रपट तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम करतो. मराठी मनोरंजनक्षेत्रात नावावरूनच कुतूहल जागं करणाऱ्या चित्रपटाची चर्चा सध्या रंगत असून २३ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 
अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

About The Author