रजनीकांत आणि त्यांचा जावई धनुष लवकरच करणार मराठीत पदार्पण

रजनीकांत आणि त्यांचा जावई धनुष लवकरच करणार मराठीत पदार्पण

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड म्हणजेच ‘सुपरस्टार रजनीकांत’ यांनी आजवर तमिळ, तेलगु, कन्नड, हिंदी अशा अनेक भाषांमध्ये काम केलेलं आहे. मराठीत हि कधीतरी काम करावं अशीही त्यांची इच्छा होती, जी ‘पसायदान’ या मराठी चित्रपटाद्वारे पूर्ण होणार आहे. बाळकृष्ण सुर्वे या सिनमाची निर्मिती करत आहेत. तर दिपक भावे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. ‘पसायदान’ या चित्रपटात दक्षिणेतले दिग्गज अभिनेते मामुटी हि आपल्याला मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

      धनुष हा उत्तम गायक आणि अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. त्यानेही आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमधून उत्तोमोत्तम भूमिका साकारलेल्या आहेत. धनुष हा ज्येष्ठ  संगीतकार इलैयाराजा यांचा चाहता आहे. इलैयाराजांसाठी आपण एकतरी गाणे गावे, अशी त्याची तीव्र इच्छा होती. आणि ऐके दिवशी तशी संधी त्याला चालून आली. रजनीकांत आणि मामुटी यांना ‘पसायदान’ या चित्रपटासाठी एकत्र आणणाऱ्या बाळकृष्ण सुर्वे यांनी इलैयाराजा यांना ‘फ्लिकर’ या मराठी चित्रपटाची गाणी संगीतबद्ध करण्यासाठी विनंती केली होती. इलैयाराजांनी सुर्वेंच्या विनंतीला मान देऊन ‘फ्लिकर’ या चित्रपटाला संगीत द्यायचं कबूल केलं. मग बाळकृष्ण सुर्वे यांनी धनुषला हि गळ घातली ‘फ्लिकर’ चित्रपटातील गाण्यांना त्याचा आवाज देण्यासाठी. इलैयाराजा हा प्रोजेक्ट करत आहेत हे कळल्यावर धनुष हि लगेच तयार झाला. चेन्नईमध्ये नुकतंच या गाण्याचं रेकॉर्डींग पूर्ण झालं असून फक्त सहा तासात हे रेकॉर्डींग पूर्ण झालं आहे. ‘फ्लिकर’ हा चित्रपट अमोल पाडवे दिग्दर्शित करणार असून यातील गीतांचे रचनाकार आहेत मंगेश कांगणे.

रजनीकांत आणि धनुष या धमाकेदार सासरे आणि जावयाच्या जोडीचा मराठीत धडाकेबाज प्रवेश मराठी सिनेसृष्ठीसाठी अभिमानास्पद आहे. त्याच बरोबर इलैयाराजांसारखे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक, ज्यांनी सुरांना त्यांच्या तालावर नाचवलं, त्यांचं संगीत मराठी मातीत मिसळल्याचा आनंद प्रत्येक मराठी माणसाला मिळणार आहे. दक्षिणेत रजनीकांत यांचा चित्रपट म्हणजे एक उत्सव असतो. आपल्या लाडक्या सुपरस्टारला पाहण्यासाठी लोक तुडुंब गर्दी करतात. कारण रजनीकांत आणि प्रेक्षकांचं, प्रेमाचं एक वेगळं नातं तयार झालेलं आहे. रजनीकांत आणि महाराष्ट्र याचं हि एक अतूट नातं आहे. महाराष्ट्रातील लोक रजनीकांतकडे एक मराठमोळा तरुण जो आपल्या प्रतिभेच्या जोरावर सुपरस्टार झाला आणि अनेकांचा प्रेरणास्थान बनला अशा आश्वासक नजरेनेच पाहतात. असा शिवाजीराव गायकवाड वयाच्या ६८व्या वर्षी हि २८ वर्षाच्या तरुणाची ऊर्जा घेऊन मातृभाषेला मानवंदना देण्यासाठी सज्ज झालेला आहे. एक महाराष्ट्रीयन म्हणून अशा दिग्गजांचं दिमाखदार पद्धतीने स्वागत करायला आपण हि सज्ज व्हायला हवं.

        मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडीं आणि गमती जमतीं जाणून घेण्यासाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.