चित्रपटसृष्टीत होणार रणांगण

आपल्या चित्रपटसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. या शंभर वर्षात अनेक गोष्टी बदलल्या. काही जुन्या गोष्टींमध्ये  काहीशा प्रमाणात बदल करण्यात आला तर बाकीच्या गोष्टी तशाच ठेवल्या गेल्या तर काही गोष्टींची जागा पूर्णपणे नव्या गोष्टींनी घेतली. चित्रपटसृष्टीतील कॅमेरा, कॅमेऱ्याचे साहित्य, लाईट्स, पडदे, चित्रीकरणाच्या पद्धती, संकलनाची पद्धत, ध्वनिमुद्रणाची पद्धत , चित्रपटाच्या सादरीकरणाची पद्धत अशा विविध गोष्टींमध्ये काळानुरूप अनेक बदल झाले. चित्रपटसृष्टीतील बदल हे इथेच थांबले नाहीत तर हा प्रवाह चित्रपटाच्या प्रसिद्धी करण्याच्या प्रकारांमध्ये देखील दिसून येतो. चित्रपटाच्या जाहिरातींमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल झाले. चित्रपटाच्या जाहिरातींमधील बदल हा आपल्याला चित्रपटाच्या बदलत्या पोस्टर मधुन पाहण्यास मिळतो.हे सर्व बदल हिंदी आणि मराठी या दोन्ही चित्रपटसृष्टीत दिसून येतात.

पोस्टर च्या आठवणी

पूर्वी देखील आज सारखीच चित्रपटांची मोठ मोठी पोस्टर लागायची. परंतु आजचे चित्रपटांचे पोस्टर आणि पूर्वीच्या चित्रपटांच्या पोस्टर मध्ये खूप बदल झालेले आहेत. पूर्वी चित्रपटांचे हे पोस्टर वेगवेगळ्या चित्रकांरांकडून काढून घेतले जायचे. चित्रकारांच्या या कलेची जागा हळूहळू प्रगत तंत्रज्ञानाने घेतली आणि पोस्टर संगणकावर तयार होऊन छापील स्वरूपात येऊ लागली. चित्रकारांनी स्वहस्ते रेखाटलेल्या पोस्टर च्या आठवणी आता परत आला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत येऊ घातलेल्या रणांगण या चित्रपटाचे पोस्टर हे चित्रकारांतर्फे रेखाटण्यात आले आहे.हे पोस्टर, पोस्टर डिझायनर सचिन गुरव यांच्या कालात्मकतेतून साकारले आहे .चित्रपटाच्या पोस्टर मध्ये आपल्याला स्वप्नील जोशी , सचिन पिळगावकर ,  सिद्धार्थ चांदेकर आणि प्रणाली घोगरे हे कलाकार दिसतात.प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण करण्यात हे पोस्टर यशस्वी ठरले आहे.

पोस्टर मध्ये स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगावकर यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांतून रोष जाणवतो व हा रोष रणांगणात होणाऱ्या युद्धाची कल्पना करून देत आहे. सिद्धार्थ चांदेकर आणि प्रणाली घोगरे यांच्या चेहऱ्यावरील गूढता प्रेक्षकांना चित्रपटाविषयी विचार करण्यास भाग पाडते.हे पोस्टर पुन्हा एकदा हस्त रेखीत पोस्टर च्या आठवणी आणणार यात काहीही शंका नाही.

कोण असतील कलाकार?

चित्रपटात स्वप्नील जोशी , सचिन पिळगावकर, सिद्धार्थ चांदेकर ,प्रणाली घोगरे असे सगळेच तगडे कलाकार दिसून येत आहेत. चित्रपटाच्या शीर्षका वरून आणि पोस्टर वरून प्रेक्षकांना चित्रपटाच्या गूढ विषयाबाबत  कल्पना येते. रणांगण या चित्रपटाची प्रस्तुती स्पोर्ट्स एंटरटेनमेंट मीडिया सोल्युशन्स(जीसीम्स) आणि हार्वे फिल्म्स यांनी केली आहे तर निर्मिती ‘५२ विक्स एंटरटेनमेंट व करिष्मा जैन आणि जो राऊत यांनी केली आहे. अर्जुन सिंग बर्रन, स्वप्नील जोशी आणि कार्तिक निशानदार हे सह निर्माते आहेत.