कोकणातल्या रात्रीस पुन्हा खेळ चालणार आणि पुन्हा एक नवीन रहस्य तुम्हाला भुलवणार..!!

कोकणातल्या रात्रीस पुन्हा खेळ चालणार आणि पुन्हा एक नवीन रहस्य तुम्हाला भुलवणार..!!

 

कोकणातली भुतं म्हणजे खूप भयंकर शिंच्यानो.. ‘कोकणातल्या भुता तू मला नको रे बाबा धरुस.. मी तुला रोज नैवेद्य चढविन. तुझ्या पिंपळाच्या वाटेलाही जाणार नाही..’ असे सांगत भूत, जखिण, हडळ, पिशाच्छ, मुंज्या कोणाकोणाला बाधला अन कोनाकोणावर उतला ह्याच्या गोष्टी, नुसत्या गोष्टी नव्हे तर रंगतदार गोष्टी आपण आजही ऐकतो. पण ह्या गोष्टी सांगणाऱ्या नं मात्र भूत कधीच पाहिलेले नसते. त्याच्या मामा, काका, आत्या, आजोबा अशा कोणीतरी अनुभवलेलं असतं म्हणे. म्हणजे संगोवांगी आलेल्या त्या कथा.. आता त्या किती खऱ्या असतील.?? सांगणाऱ्या नं मीठ मसाला लावून फक्त दुसऱ्यांना सांगितल्या. दरवेळी त्या भुताचा अक्राळविक्राळ रूपाचं वर्णन एकेका मुद्द्यानं वाढवत न्यायचं.. म्हणजे कथा मोठी मोठी होत जाते आणि ऐकणारे घाबरून राहतात.. भुताशी दोन हात केलेला माणूस म्हणून आदरही वाढतो.. एवढेच काय ते फायदेशीर..

अशाच कोकणातल्या भुताखेतांच्या गोष्टींचा संदर्भ घेऊन झी ने ‘रात्रीस खेळ चाले’ आशा नावाची एक भुताटकी सीरिअल आणली होती. शेवटच्या भागापर्यंत त्या सीरिअलनी सगळ्यांना इमाने इतबारे खूप घाबरवला देखील. पण शेवटी ती एक भूत कथा नसून मर्डर मिस्ट्री निघाली इतकंच.. पण त्याचे टायटल सॉंग, बॅकग्राउंड म्युसिक आणि कलाकारांचा अभिनय इतका चपखल होता की पाहणाऱ्याची भीतीने गाळण उडत असे. त्यातले सगळे कलाकार ते करत असलेल्या पत्रात इतके गुंगून जायचे की समोरच माणूस आहे का भूत असा प्रश्न पडावा. भुताटकीने भरलेले ते गूढ वातावरण आणि कोकणच्या प्रसिद्ध भूतकथा ह्यांचा परिणाम चांगलाच दिसत होता. त्या सिरीलच शूटिंग सुद्धा म्हणे कोकणातच केलं गेलं आणि तो रहस्यमय वाडा पण तिथलाच.. सगळी भहत्ती कशी जबरा जमवली होती. प्रेक्षक घाबरलाच पाहिजे, नाही घाबरला तर पैसे परत..!!

 
 

READ ALSO :  तिचं सौंदर्य इतकं लोभस आहे की चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये 5 सेकंदाचं दर्शन सुद्धा चाहत्यांना मोहून टाकतंय….!

तुफान हिट झाली होती ही सिरीयल. तिचा टीव्ही वरचा स्लॉट पण रात्रीचा १० वाजताचा. म्हणजे बाहेर अंधार असताना असल्या कार्यक्रमांचा प्रभाव पण तितकाच वाढतो. आता ह्याच सिरीलच्या चमूने त्यांच्या लाडक्या प्रेक्षकांना पुन्हा घाबरवण्याचा घाट घातलाय. ऐकलं का..?? आता तुमची पळताभुई थोडी करायला पुन्हा रात्रीचे भन्नाट खेळ चालू होणार आहेत. होय.. रात्र, अंधार, मिणमिणते दिवे, रातकिड्यांची किर्रर्र किर्रर्र, त्या भयाण सावळ्या आणि अंगावर येणार तो काटा.. पुन्हा सज्ज व्हा दचकायला, दरदरून आलेला घाम पुसायला आणि भीतीने लटलट कापायला..!! तुम्ही शूरवीर असाल तर हरकत नाही मग हा दुसरा सिझन बघाच आणि भित्रे असाल तर दिवसा त्याचा रिपीट टेलिकास्ट तरी पहा. पण नवरसातील भयरसाचे रसपान जरूर करा.. त्यातही वेगळी मजा असतेच…!!

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author