वेगवेगळ्या विचारांची माणसं एकत्र आली तर कसलं अफलातून रेडिमिक्स तयार होईल?

वेगवेगळ्या विचारांची माणसं एकत्र आली तर कसलं अफलातून रेडिमिक्स तयार होईल?

एक समीर नावाचा हुशार, हँडसम, देखणा, मुलगा आहे. ही सगळी विशेषणं असलेला हा ‘चिकणा’ मुलगा शर्ट खरेदी करायला जातो एक दुकानात, शंभर प्रकारचे शर्ट बघतो, त्यातले काही पसंत करतो सुद्धा. पण खरेदी करताना तो हेच शर्ट खरेदी करायचे असा ठाम निर्णयच घेऊ शकत नाही. आणि शर्ट न खरेदी करतात घरी परत येतो. असे आपल्यामध्ये बरेच लोक असतात, स्वतःचा ठाम निर्णय घेऊ शकत नाहीत.

दुसरी एक मुलगी आहे सानिका नावाची. तिच्या डोक्यात एखादा विचार आला की सारखे विचारांवर विचार चालू होतात, म्हणजे एक काम करायचं तर हजार विचार डोक्यात येतात.असं, करू, तसं करू, हे करून बघू, ते करून बघू, असा दिवसभर विचारच करत राहते, आणि काम काही पूर्ण होतंच नाही. नुसता विचारच करत बसते. कृती काहीच होत नाही तिच्या हातून. तिसरी म्हणजे आणखी एक मुलगी आहे, तिचं नाव आहे नुपूर. जी दिसायला, सुंदर, खूप हुशार सुद्धा आहे. तिची कामं करायची पद्धत एकदम भारी, आलं डोक्यात की फटकन काम करून मोकळी होते. म्हणजे एखादा विचार डोक्यात आला की लगेच कृती करते. म्हणजे निर्णय घेऊन लगेच कृती, अशी तिची कामाची पद्धत, पण ह्या कृतीचा विचार ती आधी करत नाही. आधी कृती आणि नंतर विचार.

 

READ ALSO :  सर्व लाईन्स व्यस्त आहेत पण फोन च्या का हृदयाच्या..? कळेल लवकरच

‘समीर’ निर्णय घेऊ शकत नाही, सानिका फक्त विचारच करत राहते, कृती करू शकतच नाही. आणि नुपूर बे धडक कृती आधी करते, आणि विचार नंतर करते. आणि तिघांच्या प्रॉब्लेमवर जर एखादं रेडी मिक्स तयार झालं तर? किती सोप्प होईल ह्यांचं जगणं!. हे तिघे एकमेकांना भेटले तर काय काय गमती जमती होतील, कोणाला कोणाचा कोणता गुण आवडेल हे जर सगळं आपल्याला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाले तर? लवकरच ह्या सगळ्या गमती जमती आपल्यासाठी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. समीर म्हणजे हँडसम ‘वैभव तत्ववादी,’ सानिका म्हणजे ‘स्नेहा जोशी’ आणि नुपूर ची भूमिका करणार आहे ‘ प्रार्थना बेहेरे’.खरी खरी करमणूक, आणि खरी मज्जा अनुभवायला ‘रेडी मिक्स’ हा चित्रपट पाहायलाच हवा. कारण ह्या चित्रपटाला ‘का रे दुरावा’ फेम ‘जालिंदर कुंभारचं दिग्दर्शन आहे. मजेशीर ट्रेलर असलेला, एकदम भन्नाट “रेडी मिक्स” बघायला विसरू नका…!

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author