रेडू ची झलक

रेडू ची झलक

चित्रपटाच्या प्रसिद्धी मध्ये अनेक गोष्टी महत्त्वाच्या असता. यांत शीर्षक, ट्रेलर, चित्रपटातील गाणी आणि चित्रपटातील कलाकारांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष केलेली चित्रपटाची प्रसिद्धी यांचा समावेश होतो.रेडू या चित्रपटाचे शीर्षक आधी प्रसिद्ध करण्यात आले.रेडू या नावाने प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण तयार केले .अनेकांनी रेडू या शीर्षकांचे वेगवेगळे अर्थ देखील लावले आणि यांत प्रसिद्ध कलाकारांचा देखील सहभाग होता.त्यांनतर रेडू चे पोस्टर प्रसिद्ध झाले. प्रेक्षकांना पोस्टर मधून समजले की रेडू म्हणजे  दुसरे तिसरे काहीही नसून एक रेडिओ आहे. पोस्टर मध्ये एक माणूस दाखवण्यात आला होता ज्याच्या चेहऱ्याच्या जागी एक रेडिओ होता त्यामुळे चित्रपटाचा नायक कोण हे प्रेक्षकांना माहिती नव्हते. आता रेडू या चित्रपटाचा चा ट्रेलर प्रदर्शित झाला असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटाचा नायक कोण ह्या शंकेचे निवारण झाले आहे.

रेडू – ट्रेलर

रेडू या चित्रपटाची ची निर्मिती नवलकिशोर सारडा यांनी केली आहे व दिग्दर्शक सागर छाया वंजारी यांनी रेडू या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.चित्रपटाची कथा संजय नावगिरे यांच्या लेखणीतून साकार झाली आहे. रेडू हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच त्याला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. प्रदर्शित व्हायच्या आधीच बरेच पुरस्कार पदरात असल्याने रेडू प्रदर्शित झाल्यावर काय किमया साधेल याचा अंदाज लावता येईल. कोकणातील काही साध्या गावांमध्ये चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. ट्रेलर मधून जी दृश्ये दाखवण्यात आली आहेत त्यावरून लक्षात येते की कथानक हे १९७० च्या काळातील आहे आणि तंत्रज्ञानाची प्रगती होण्याआधीच्या काळातील आहे.रेडिओ बरोबरच कोकणात राहणारा तातू , तातूचे कुटुंब त्यातील प्रेम -जिव्हाळा या गोष्टी कथानकात महत्त्वाच्या ठरतात. तातूची त्याच्या रेडिओ प्रती असणारी आत्मियता ट्रेलर च्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचते. तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती व्हायच्या अगोदर असलेल्या मनोरंजनाच्या काही माध्यमातील एक म्हणजे रेडिओ.

रेडू – कलाकार

 सुप्रसिद्ध अभिनेते शशांक शेंडे आणि छाया कदम हे रेडू या चित्रपटात आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.रेडू या चित्रपटात विनम्र भाबल, मृण्मयी अरुण सुपल , गौरी कोंगेहे सुद्धा महत्वाच्या भूमिकेत दिसतील .आतापार्यंत शशांक शेंडे यांनी चाहत्यांनी गंभीर भूमिका करताना पाहिले आहे परंतु रेडू या चित्रपटाच्या च्या निमित्ताने ते विनोदी भुमिका करताना दिसणार आहेत.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Crisenta Almeida

"Crisenta Almeida is a seasoned writer who goes by the description, WRITER BY DAY. READER BY NIGHT. She has been a writer with the content industry for a good number of years, which inspired her to start her content agency. Madly in love with storytelling, she knows how to weave a tale."