बाहुबली पेक्षाही भव्य असणार हा “छत्रपती शिवाजी महाराजांवर” तयार होणारा चित्रपट.

बाहुबली पेक्षाही भव्य असणार हा “छत्रपती शिवाजी महाराजांवर” तयार होणारा चित्रपट.

मराठी चित्रसृष्टीला आता “अच्छे दिन आलेत” असं म्हणायला काहीही हरकत नाही आता. त्याचं कारण, एका पेक्षा एक सरस चित्रपट गेल्या दोन तीन वर्षात आपल्याला पाहायला मिळालेत. त्यातले कलाकार सुद्धा जबरदस्त भूमिका वठवतायत. उत्कृष्ट दिग्दर्शन, सुंदर पार्श्व संगीत, अफलातून तंत्रज्ञान वापरून हे सर्वांग सुंदर चित्रपट तयार होत आहेत, कुठला आधी पहावा हेच कळत नाही. सतत नवीन काहीतरी घेऊन येणारे हे चित्रपट म्हणजे पर्वणीच ठरली आहे. आणि सगळेच भारी. अहो जे लोक सिनेमा बघत नव्हते ते पण आता एकही सोडत नाहीत. म्हणून हा चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळच म्हणू. आता नवीन काय ? ही उत्सुकता लागून राहते , की येतोच एखादा मस्त सिनेमा. दमच नाही.

आता ज्याला खरा दमदार सिनेमा म्हणता येईल असा एक नव्या दमाच्या कलाकारांना घेऊन येतोय, महाराष्ट्राच्या मातीतला हा एक मराठी सिनेमा. बाहुबली पेक्षा भव्य असणार आहे हा सिनेमा. कारण हा असणार आहे महाराजांच्या जीवनावरचा, हो महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा. म्हणून हा सगळ्यात भव्य असायलाच पाहिजे. आता बाहुबली पेक्षा भव्य म्हणजे म्हणजे कल्पना करा, आज पर्यंतच्या सगळ्या मराठी ऐतिहासिक चित्रपटात सगळ्यात भव्य. म्हणजे कसा असणार हा चित्रपट?.

 

READ ALSO :  बॉलिवूड मुळे झाली मराठी चित्रपटांची दैना.. त्यांना कधी थेटर तर कधी जास्ती शोजच मिळेना..

‘लय भारी’, माऊली, ह्या दोन चित्रपटांच्या यशा नंतर “रितेश देशमुख” घेऊन येतो आहे हा भव्य चित्रपट. मराठी माणूसच अशा चित्रपटांना न्याय देऊ शकतो. म्हणून “रितेश देशमुखने” ही जबाबदारी पेलण्याचं धाडस केलं आहे, महत्वाची गोष्ट म्हणजे स्वराज्य उभे करण्याची महाराजांची मनीषा साकार होतानाचे सगळे महत्वाचे प्रसंग ह्या चित्रपटात भव्य स्वरुपात दाखवले जाणार आहेत. आणि छत्रपतींची तरुणपणातली आणि राज्याभिषेकाच्या वेळेच्या रयतेची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर उचळणाऱ्या परिपक्व “जाणता राजा शिवछत्रपती” ही भूमिका सुद्धा रितेश देशमुख करणार आहे. दोन्ही भूमिका करताना त्याने स्वतः मध्ये काय बदल केला आहे हे अनुभवायला सगळेच उत्सुक असणार. ह्या दोन तीन वर्षात बऱ्याच गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन ज्या खंद्या दिग्दर्शकानं केलं आहे त्याच “रवी जाधव” यांनी ह्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ही सुद्धा एक जमेचीच बाजू म्हणता येईल.

बरेच वर्षांनी मराठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट येतोय आणि तो सुद्धा भव्य दिव्य, म्हणून त्याला खूप मागणी असणार ह्यात शंकाच नाही. आता बाकीचे महाराजांच्या युद्धाचे, आग्र्याहून सुटकेचे, राज्याभिषेकाचे सगळे प्रसंग कसे साकारले जाणार त्यावर ह्या चित्रपटाला मोठं यश मिळणार आहे. पण एवढ्या बिग बजेटचा हा चित्रपट असल्यामुळे नक्कीच सगळ्या गोष्टी उत्तमच असणार. त्यामुळे आत्ताच्या तरुण पिढीला महाराज्यांच्या अफाट कर्तृत्वाचा इतिहास रुपेरी पडद्यावर जाणून घेता येणार आहे . कारण गेल्या अनेक वर्षात असा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर एकही चित्रपट आला नाही जसा भालजी पेंढारकर यांचा “छत्रपती शिवाजी” हा उत्कृष्ट चित्रपट होता. चंद्रकांत मांढरे यांनी महाराजांची कायम लक्षात राहील अशी उत्कृष्ट भूमिका साकारली होती.

त्यामुळे ह्या चित्रपटाला खूप मोठा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे सांगायलाच नको.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author