रितेश देशमुख लागलाय त्याच्या आगामी ‘माऊली’ चित्रपटाच्या तयारीला

रितेश देशमुख लागलाय त्याच्या आगामी ‘माऊली’ चित्रपटाच्या तयारीला

२०१४ साली लय भारी या चित्रपटाद्वारे अभिनेता रितेश देशमुख याने मराठी सिनेसृष्ठीत धमाकेदार प्रवेश केला. त्या चित्रपटातील त्याच्या माऊली या व्यक्तिरेखेला लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. माऊलीची अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची अदा.. माऊलीच्या संवाद फेकीचा अंदाज.. सगळं सगळं प्रेक्षकांना खूप भावलं. म्हणूनच प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी करून चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी केला. त्या व्यक्तिरेखेचे ऋण फेडण्यासाठीच कि काय, पण रितेश देशमुख घेऊन येत आहे त्याने अभिनय केलेला दुसरा मराठी चित्रपट.. ‘माऊली’.

महाराष्ट्रातील जनतेसाठी ‘पंढरीचा विठ्ठल’ म्हणजे सतत काळजी घेणाऱ्या ‘आईसारखा’ आहे. म्हणून विठ्ठलाला ‘माऊली’ असं संबोधलं जातं. पंढरीचे वारकरी एकमेकांना ‘माऊली’ म्हणूनच हाक मारतात, कारण हिंदू धर्मात प्रत्येक व्यक्तीमध्ये देव पाहण्याची शिकवण दिली जाते. अशा ‘माऊली’ नावाच्या व्यक्तीची कथा घेऊन रितेश दुसऱ्यांदा रसिकांसमोर लवकरच येणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण ८ एप्रिल २०१८ रोजी सुरु झालेले आहे. खरे पाहता २०१५ सालीच या चित्रपटाची घोषणा करण जोहर ने ट्विटच्या माध्यमातून केली होती. तेव्हा निशिकांत कामत ज्यांनी ‘लय भारी’ हा चित्रपट दिग्दर्शित केला, तेच ‘माऊली’ हा हि चित्रपट दिग्दर्शित करणार होते. पण काही कारणास्तव चित्रपट लांबणीवर पडला आणि जमलेली भट्टी अचानक थंड पडली. पण २०१८ मध्ये रितेश पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागलेला आहे. यावेळी माऊली चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निशिकांत कामत यांच्या ऐवजी आदित्य सरपोतदार उचलणार आहेत. मुंबई फिल्म कंपनी निर्मित या चित्रपटाचे लेखन केलेले आहे क्षितीज पटवर्धन यांनी. आदित्य आणि क्षितीज यांनी रितेशने निर्मिती केलेल्या ‘फास्टर फेणे’ या चित्रपटात हि एकत्र काम केलेले आहे. रितेशच्या ‘मुंबई फिल्म कंपनी’ या निर्मिती संस्थेने या आधी ४ सुपरहिट मराठी चित्रपट बनविलेले आहेत. फास्टर फेणे, बालक पालक, यल्लो आणि लय भारी.

१८ जूनला रितेशने एक विडीओ twitterवर प्रदर्शित केला, ज्यात त्याने माऊली चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शकांचं स्वागत केलं, ते दुसरे तिसरे कोणी नसून मराठी प्रमाणे हिंदी सिनेसृष्ठीत हि आपल्या संगीतकौशल्याचा डंका वाजवणारे अजय-अतुल आहेत. लय भारी या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन हि अजय-अतुल यांनीच केले होते. त्यातील माऊली माऊली हे गाणं त्यावेळी खूपच गाजलं होतं.

रितेश देशमुखकडून प्रेक्षकांना उत्कृष्ठ चित्रपटांची अपेक्षा आहे. आतापर्यंत रितेश प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झाला आहे… आता पाहायचं आहे कि माऊली चित्रपट रसिकांचे मनोरंजन करण्यात किती यशस्वी होतो ते…

       मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडींसाठी आणि गमती जमतींसाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.