आज रोहित शेट्टी चा मराठी चित्रपट आला ..! पहा त्याचे मराठी प्रेम..

आज रोहित शेट्टी चा मराठी चित्रपट आला ..! पहा त्याचे मराठी प्रेम.. 

 

मातृभाषा आपल्या आईच्या भाषेवरून मानली जाते. पण रोहित शेट्टी पत्नीभाषा पण समजतो.. त्याचं कसं आहे.. परवाच चला हवा येऊ द्या मध्ये तो आपल्या मराठी सिनेमाचं प्रोमोशन करायला आला होता. कोणता मराठी सिनेमा म्हणता..?? अहो सिम्बा..!! हो हो हो हिंदी बॉलीवूड चा आहे तो सिनेमा तरीही आम्ही त्याला मराठी सिनेमाच म्हणणार.. का नाही म्हणायचं..?? त्यात तब्बल १४ कलाकार मराठी आहेत हो.. आणि त्यातील मुख्य पात्र ‘सिम्बा भालेराव’..?? हे काय पंजाबी नाव आहे का..?? अरे आपला मराठमोळा हिरो रंगवलाय रणवीर सिंग नं.. कित्येक वर्षे फक्त मल्होत्रा, शर्मा, चोपडा अशी नावं ऐकतोय.. पण आता माझी सटकली म्हणत बाजीराव सिंघम आला आणि त्याने बाजी मारली. मराठी भाषा आणि मराठमोळं वातावरण ह्याला बॉलिवूड मध्ये आपल्या रोहित शेट्टीने चांगलीच जागा मिळवून दिली..

 

READ ALSO :  ज्यांच्या सिनेमाचा ट्रेलरच अंगावर काटे आणतोय तो सिनेमा कसा असेल..!!??

आता त्याचा सिम्बा आलाय.. तर चला हवा येऊ द्या मध्ये रोहित ने लाजत लाजत कबूल केले की त्याची बायको मराठी आहे. मग काय गृहमंत्र्यांची आवड पण जोपासली पाहिजे.. म्हणून ह्या सिनेमाद्वारे तो मराठी बाणा जपत असतो.. पण हा गमतीचा भाग झाला.. खरे तर रोहित म्हणतो की, “मराठी सृष्टीतले कलाकार आणि इतर कलाकार ह्यांच्यात खूप फरक आहे. एरवी साधे आणि जमिनीवर पाय ठेवून वागणारे हे मराठी कलाकार काम करायला वाघ आहेत. त्यांची शैली इतर कलाकारांपेक्षा वेगळी आणि प्रगल्भ आहे. आणि परत कुठेही ग ची बाधा नसलेले हे कलाकार मला आवडतात. ह्यांच्या बरोबर काम करायला मजा येते.”

त्यामुळे रोहितचे चित्रपट आपल्या मराठी कालाकारांशिवाय पूर्णच होत नाहीत..

रणवीर सिंगला सुद्धा आपण मराठमोळ्या अंदाजात पूर्वी ही पाहिलं आहे. बाजीराव मस्तानी मध्ये बाजीरावाचा रोल त्याने चपखल (मराठी कलाकारासारखा) केला. त्यामुळेच सिम्बा मध्ये सुद्धा तो मराठमोळा पोलीस इंस्पेक्टर म्हणून शोभून दिसेलच. त्याच्या बरोबर आहे आईचा चेहरा चिकटवलेली सारा अली खान. म्हणजे तिला बघून अमृता सिंगच पुन्हा सिनेमात काम करतीये असे वाटते. असो पण ह्या दोघांबरोबर बाकीची टीम म्हणजे मराठी गँग च आहे जणू.. सिद्धार्थ जाधव, अरुण नलावडे, अश्विनी काळसेकर, विजय पाटकर, सौरभ गोखले, अशोक समर्थ, सुचित्रा बांदेकर असे सगळी मराठी फौज आहे.. आणि हो काशीनाथ घाणेकर फेम गोड चेहऱ्याची वैदेही परशुराम देखील आहे हो.. अजूनही काही कलाकार मराठीच आहेत. करण जोहर ह्याचा प्रोड्युसर पार्टनर असून सुद्धा त्याच्या चित्रपटासारखं गुळगुळीत वातावरण नसून सगळं मराठी राडा होणार आहे..!! मग मंडळी वाट कसली बघताय.. चला पटापट बघून या सिनेमा आणि आम्हालाही कळवा कसा वाटला..!!

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author