‘लव्ह यु जिंदगी’ म्हणत आपले सर्वांचे लाडके महागुरु प्रेक्षकांच्या भेटीस

‘लव्ह यु जिंदगी’ म्हणत आपले सर्वांचे लाडके महागुरु प्रेक्षकांच्या भेटीस

महागुरु म्हणजे सचिन पिळगांवकर हे चिरतरुण आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.  आजही ते अगदी सहज कोणतीही भूमिका साकारू शकतात. ते एक अष्टपैलू कलाकार आहेत. अभिनय, दिग्दर्शन, संगीत, नृत्य, गायन, आणि चित्रपटनिर्मिती अशा सर्वच बाबतीत ते पारंगत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वात जास्त कालावधी त्यांनी घालवला आहे यात काहीच शंका नाही. त्यांनी आजवर साकारलेल्या त्यांच्या भूमिका ह्या त्यांच्या प्रत्येक भूमिकेपेक्षा भिन्न होत्या. आता ते अजून एक भिन्न धाटणीची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एस. पी. प्रोडक्शन्स निर्मित आणि मनोज सावंत दिग्दर्शित ‘लव्ह यु जिंदगी’ मध्ये अभिनेते सचिन पिळगांवकर महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. अनिरुध्द बाळकृष्ण दाते या एका सामान्य गृहस्थाच्या भूमिकेतील सचिन पिळगांवकर यांचे प्रमुख पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले होते. वय झाले असले तरी काय… आयुष्य आनंदाने जगण्याची इच्छा मनी बाळगणारा असा हा अनिरुध्द दाते. पण आयुष्यातील खरा आनंद म्हणजे तारुण्य मानणा-या अनिरुध्दची पुन्हा एकदा तारुण्य उपभोगण्याची इच्छा आणि त्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न हा अनिरुध्द दातेचा एकंदरित प्रवास म्हणजेच ‘लव्ह यु जिंदगी’ अशा या हलक्या-फुलक्या, सुंदर आणि प्रेमळ चित्रपटात सचिन पिळगांवकर यांच्यासोबत आणखी कोणते कलाकार असतील हे नक्कीच जाणून घेण्याची इच्छा अनेकांची असेल.

 

READ ALSO : मराठी संगीत विश्वातील संगीताचा देव हरपला: ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’,

‘लव्ह यु जिंदगी’ मध्ये सचिन पिळगांवकरांसोबत प्रमुख भूमिकेत कोणती अभिनेत्री दिसणार आहे याची उत्सुकता सगळ्यांच्याच मनात होती आणि ही उत्सुकता लक्षात घेता नुकतेच या चित्रपटाचे आणखी एक नवे-कोरे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आणले आहे. तर आपल्या सुमधुर हास्याने आणि सहज-सुंदर अभिनयाने सर्वांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे या चित्रपटात सचिन पिळगांवकर यांच्यासोबत महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. नवीन पोस्टरच्या माध्यमातून या चित्रपटातील प्रार्थना बेहरेचा लूक नक्की कसा असेल याचा अंदाज तुम्हांला आता आला आहे. प्रार्थनाने आतापर्यंत अनेक चित्रपटांतून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत आणि तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनीहीदेखील तितकाच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ‘लव्ह यु जिंदगी’ मधील कूल आणि स्टायलिश लूकमधून प्रार्थना एका आगळ्या-वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे आणि तिच्या भूमिकेची झलक तिच्या चाहत्यांना लवकरच टीझरमधून दिसेल. पुन्हा एकदा प्रेक्षकांची चित्रपटाविषयी असलेली कुतुहलता लक्षात घेता या चित्रपटाचा टीझर लकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे.

सचिन बामगुडे निर्मित ‘लव्ह यु जिंदगी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह मनोज सावंत यांनी चित्रपटाची कथा देखील लिहिली असून येत्या १४ डिसेंबरला आयुष्यावर नव्याने प्रेम करायला लावणारा ‘लव्ह यु जिंदगी’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author