सई ताम्हणकर : लव्ह सोनिया मधली अंजली

सई ताम्हणकर : लव्ह सोनिया मधली अंजली

सई नेहमीच तिच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत असते, सध्या तिच्या लव्ह सोनिया या हिंदी चित्रपटातील भूमिकेमुळे पुन्हा चर्चेत आहे. पण हि चर्चा आहे तिच्यातील कालागुनाबद्दल. सईने मराठी चित्रपटसृष्टी प्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीत चांगले नाव कमावले आहे. बोल्ड अंड ब्युटीफुल अशी प्रतिमा असलेली सई. लव्ह सोनिया हा हिंदी चित्रपट लहान मुले व मुली यांची तस्करी यावर आधारित आहे. या चित्रपटाची सध्या हिंदी चित्रपट सृष्टीत बरीच चर्चा सुरु आहे. एक फारच संवेदनशील विषय आहे त्यातही त्या विषयावर अगदी तंतोतंत वातावरण निर्मिती करून हा चित्रपट साकारणे खरच कौतुकास्पद गोष्ट आहे. अशा चित्रपटात एक आव्हानात्मक भूमिका साकारणे आणि त्या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी आवशयक ती तयारी करणे हेही तेवढेच महत्वाचे आहे.

 

READ ALSO : बोगदा : आई मुलीच्या नात्याची गोष्ट

वजनदार या मराठी चित्रपटासाठी सईने बरेच वजन वाढवले होते. कारण या चित्रपटाची ती गरज होती. तिचा भूमिकेला ते आवशयक होते. एका अभिनेत्रीने यशाच्या शिखरावर जात असताना एखाद्या भूमिकेसाठी आपले वजन वाढवणे म्हणजे खूप धाडसी काम आहे. त्याचप्रमाणे लव्ह सोनिया या तिच्या आगामी हिंदी चित्रपटातील भूमिकेला योग्य न्याय मिळावा म्हणून तिने पुन्हा एकदा वजन वाढवले आहे. अशा या धाडसी अभिनयामुळे ती नेहमीच वेगळी पडते. त्यातील तिची भूमिका हि अंजली नामक एका देह विक्रेतीचा आहे. अंजली हि भूमिका अगदी हुबेहूब वठवावी यासाठी तिने तिचे दहा किलो वजन वाढवले. सई याच कारणासाठी सध्या बरीच चर्चेत आहे. सई एक उत्कृष्ठ अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयात एक सहजपणा आहे. तिच्या या भूमिकेसाठी तिचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटात तिच्या सोबत मृणाल ठाकूर ही आहे. तरबेज नुरानी यांनी तो चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

या चित्रपटात तिच्या सोबत रिया सिसोडिया, फ्रेडा पिंटो, डेमी मुरे, मनोज बाजपेयी, रिचा चड्डा, अनुपम खेर, आदिल हुसेन, राजकुमार राव, आदीची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट येत्या १४ सप्टेंबर ला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सई आपल्याला एका नव्या वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सईचा हा नवीन चित्रपट असा आहे हे जाणण्यासाठी नक्की पहा लव्ह सोनिया. एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने तिचे वेगळेपण सिद्ध केले आहे.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author